-
“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
-
-
१०. फिलदेल्फिया येथील मंडळीला येशू कोणते उत्तेजन देतो?
१० अशा या अधिकारयुक्त उगमाकडून येशूचे शब्द येत असल्यामुळे ते फिलदेल्फिया येथील ख्रिश्चनांना खासपणे सांत्वन देणारे ठरले असावेत! तो त्यांची प्रशंसा करून म्हणतो: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत—पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही—तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.” (प्रकटीकरण ३:८) ती मंडळी क्रियाशील होती व तिजपुढे दार उघडलेले होते—निःसंशये, ते उपाध्यपणाच्या सेवेचे दार होते. (पडताळा १ करिंथकर १६:९; २ करिंथकर २:१२.) यासाठी, येशू मंडळीला प्रचाराच्या संधीचा पूर्णपणे फायदा घेण्यास सांगतो. त्यांनी सहन केले व दाखवून दिले की, यहोवाच्या सेवेत अधिक “कृत्ये” करण्यासाठी देवाच्या आत्म्याकडून त्यांच्याठायी भरपूर सामर्थ्य आहे. (२ करिंथकर १२:१०; जखऱ्या ४:६) त्यांनी येशूची आज्ञा पाळली व ख्रिस्ताचा, आपल्या शब्दांनी किंवा कृतीने नकार केला नाही.
-
-
“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
-
-
१४. आधुनिक काळात यशया ४९:२३ व जखऱ्या ८:२३ ची कशी अभूतपूर्व पूर्णता झाली?
१४ आधुनिक काळी यशया ४९:२३ व जखऱ्या ८:२३ ची अत्यंत अभूतपूर्व पूर्णता झाली आहे. योहान वर्गाच्या प्रचारकार्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी राज्य सेवेसाठी उघड्या दारातून प्रवेश केला.b यापैकीचे बहुतेक, जेथे ते आध्यात्मिक इस्राएल असल्याचा खोटा दावा केला जातो त्या ख्रिस्ती धर्मजगतातून आले आहेत. (पडताळा रोमकर ९:६.) हे, मोठा लोकसमुदाय या नात्याने येशूच्या खंडणी रक्तावर आपला विश्वास प्रकट करुन आपले झगे धुऊन शुभ्र करतात. (प्रकटीकरण ७:९, १०, १४) ख्रिस्ताच्या राज्याच्या अधिपत्याचे पालन करून ते, पृथ्वीवर त्याचे आशीर्वाद मिळविण्याची आशा बाळगून आहेत. ते येशूच्या अभिषिक्त बांधवांकडे येऊन त्यांना आध्यात्मिक अर्थाने ‘नमन करतात,’ कारण ‘देव त्यांच्यासोबत आहे असे त्यांनी ऐकले आहे.’ ते या अभिषिक्तांची सेवा करतात आणि ते स्वतः जागतिक बंधुत्वाच्या सहवासात संघटित होतात.—मत्तय २५:३४-४०; १ पेत्र ५:९.
-
-
“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
-
-
b योहान वर्गाद्वारे प्रकाशित होणाऱ्या द वॉचटावर या नियतकालिकाने प्रचारकार्यात शक्य आहे तितक्या अधिक प्रमाणात सहभागी होण्याची संधी साधून घेण्याची निकड सतत मांडली आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर १५, १९८५ च्या अंकातील “डिक्लेर अब्रॉड द किंग्डम ऑफ गॉड” व “अर्जंटली निडेड—मोअर हार्वेस्ट वर्कर्स!” हे लेख बघा. फेब्रुवारी १, १९८७ च्या अंकात “डुईंग आवर अटमोस्ट टू डिक्लेर द गुड न्यूज” या लेखात पूर्ण वेळेच्या ‘उघड्या द्वारातून’ आत शिरण्यावर अधिक भर देण्यात आली होती. १९९३ च्या कार्यवर्षात एका महिन्यात ८,९०,२३१ पायनियरांचा उच्चांक गाठण्यात आला.
-