-
“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
-
-
१७ फिलदेल्फिया मंडळीप्रमाणे कट्टर असणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या योहान वर्गास १९१८ मध्ये आधुनिक काळातील ‘सैतानाच्या सभेकडून’ बराच रोष पत्करावा लागला. आध्यात्मिक यहूदी असल्याचा दावा करणाऱ्या ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्यांनी राजकीय शासनकर्त्यांना, खऱ्या ख्रिश्चनांना दाबून टाकण्यासाठी युक्तिबाजपणे चिथाविले. तरीदेखील, ख्रिश्चनांनी ‘येशूच्या धीराचे वचन राखले,’ त्यामुळे ते, ‘त्यांची शक्ती थोडी होती’ तरी आध्यात्मिक मदतीने बचावले व त्यांच्यापुढे उघडून ठेवण्यात आलेल्या दाराने आत शिरू शकले. ते कोणत्या अर्थाने?
‘उघडलेले दार’
१८. येशूने १९१९ मध्ये कोणती नियुक्ती केली आणि ज्यांची नेमणूक झाली ते हिज्कियाच्या विश्वासू कारभाऱ्याप्रमाणे कसे बनले?
१८ येशूने त्याचे अभिवचन १९१९ मध्ये पूर्ण केले आणि खऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या त्या छोट्या गटास “विश्वासू व बुद्धिमान दास” अशी मान्यता दिली. (मत्तय २४:४५-४७) हिज्किया राजाच्या काळी विश्वासू कारभारी एल्याकीमने अनुभवला त्यासारख्या हक्कात यांनी प्रवेश मिळवला.d यहोवाने एल्याकीमबद्दल म्हटले: “दावीदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.” दाविदाचा बादशाही पुत्र हिज्किया याच्यासाठी एल्याकीमने मोठी जबाबदारी खांद्यावर वाहिली. तसेच, आज, अभिषिक्त योहान वर्गाच्या खांद्यावर “दाविदाच्या घराण्याची किल्ली” आहे, ते या अर्थी की, यांना मशीही राज्याची पृथ्वीवरील आस्था सोपवून देण्यात आली आहे. यहोवाने आपल्या या सेवकांच्या थोड्या शक्तीला विपुल बळ देऊन बळकटी आणली व त्यांना प्रचंड गोलार्धव्याप्त साक्षीच्या कामासाठी तयार केले.—यशया २२:२०, २२; ४०:२९.
१९. येशूने १९१९ मध्ये दिलेल्या जबाबदारीस योहान वर्गाने कसे हाताळले आणि याचा काय परिणाम झाला?
१९ अभिषिक्त शेषांनी १९१९ पासून पुढे येशूच्या उदाहरणास अनुसरुन, राज्याची सुवार्ता सर्वत्र घोषित करण्यात एक जोरदार मोहीम हाती घेतली. (मत्तय ४:१७; रोमकर १०:१८) याचा परिणाम, सैतानाची आधुनिक सभा, ख्रिस्ती धर्मजगत, याच्या काही जणांनी अभिषिक्त शेषांकडे येऊन पश्चात्ताप केला व ‘नमन केले,’ म्हणजे दासाच्या अधिकारास मान्यता दाखवली. हे देखील योहान वर्गातील वृद्धांसोबत यहोवाची एकमतात सेवा करू लागले. हे, येशूच्या अभिषिक्त बांधवांना एकत्रित करून त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत चालले. यानंतर, ‘सर्व राष्ट्रे . . . यातील मोठा लोकसमुदाय’ अभिषिक्त दासाला ‘नमन करण्यास’ आला. (प्रकटीकरण ७:३, ४, ९) हा दास व मोठा लोकसमुदाय आता यहोवाच्या साक्षीदारांचा एक कळप या नात्याने एकत्रितपणे सेवा करीत आहे.
-
-
“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
-
-
२५. येशूने फिलदेल्फिया मंडळीला दिलेल्या सल्ल्यामागील तत्त्वाचे अनुकरण प्रत्येक ख्रिश्चनाला आज कसे करता येणे शक्य आहे?
२५ फिलदेल्फिया येथील विश्वासू ख्रिश्चनांसाठी तो संदेश किती मोठे उत्तेजन देणारा ठरला असावा! तोच आज प्रभूच्या दिवसातील योहान वर्गाकरिता खचितच जोरदार धडा देतो. परंतु त्याची तत्त्वे कोणी अभिषिक्त असो की, दुसरी मेंढरे यापैकीचा असो, या सर्वांना महत्त्वाची आहेत. (योहान १०:१६) फिलदेल्फियामधील ख्रिश्चनांनी जशी राज्याची फलप्राप्ती आणली तशीच आम्ही प्रत्येकाने निपजविली पाहिजे. आम्हा सर्वांपाशी थोडी तरी शक्ती आहे. आम्हा सर्वांना यहोवाच्या सेवेत काही ना काही करता येणे शक्य आहे. तर या शक्तीचा आपण वापर करू या! राज्याच्या वाढीव हक्कासंबंधाने बघता, आम्हाला ज्या उघड्या दाराने प्रवेश करता येणे शक्य आहे तेथून शिरण्याची दक्षता राखावी. असे द्वार उघडण्यासाठी आम्ही यहोवाला प्रार्थनाही करू शकतो. (कलस्सैकर ४:२, ३) आम्ही येशूच्या सहनशीलतेच्या नमुन्याचे अनुकरण करतो व त्याच्या नावासाठी खरे असल्याचे सिद्ध करतो तेव्हा, आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो ते ऐकण्यासाठी आम्हाला कान आहेत हे आम्ही दाखवीत असतो.
-