वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • २ अलसेहीरच्या आग्नेयेस सुमारे ८८ किलोमीटर्सवर डेनिझिलजवळ आज लावदिकीयाचे अवशेष तुम्हाला आढळू शकतील. पहिल्या शतकात, लावदिकीया हे समृद्ध शहर होते. ते प्रमुख रस्त्यांच्या संगमावर वसलेले असल्यामुळे सावकारी पेढी तसेच व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सुपरिचित अशा डोळ्यांच्या अंजनाच्या विक्रीमुळे ते त्याच्या संपत्तीत अधिक भर घालत होते. तसेच, अत्युत्कृष्ट अशा काळ्या लोकरीपासून तेथेच तयार केल्या जाणाऱ्‍या उच्च प्रतीच्या कपड्यांसाठी ते प्रसिद्ध होते. या शहराची प्रमुख समस्या, पाण्याचा तुटवडा ही होती; त्यासाठी जवळच्याच उष्ण पाण्याच्या झऱ्‍यातून, कालव्याद्वारे पाणी आणून या समस्येवर मात करण्यात आली होती. अशाप्रकारे हे पाणी शहरात येईपर्यंत कोमट झालेले असे.

  • अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • ६. (अ) लावदिकीया मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीचे वर्णन येशू कसे देतो? (ब) येशूचे कोणते सुंदर उदाहरण पाळण्यात लावदिकीयातील ख्रिश्‍चनांनी अपयश दाखविले होते?

      ६ लावदिकीयासाठी येशूजवळ कोणता संदेश आहे? त्यांच्यासाठी त्याच्यापाशी प्रशंसेचे शब्द नाहीत. तो उघडपणे त्यांना सांगतो: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” (प्रकटीकरण ३:१५, १६) प्रभु येशू ख्रिस्ताकडील अशा प्रकारच्या संदेशाला तुमचा काय प्रतिसाद असणार? तुम्ही जागृत होऊन स्वतःचे परीक्षण करणार नाही का? त्या लावदिकीयाकरांनी खरेच स्वतः जागृत होण्याची गरज होती, कारण ते आध्यात्मिकरित्या आळशी झाले होते, ते सर्व गोष्टींना खूपच गृहीत धरीत होते हे उघड आहे. (पडताळा २ करिंथकर ६:१.) ज्याचे त्यांनी अनुकरण करायचे होते, त्या येशूने तर यहोवा व त्याच्या कार्यासाठी नेहमीच अत्युत्कट आवेश दाखवला होता. (योहान २:१७) याखेरीज, नम्र जनांना तो नेहमीच सौम्य व लीन आणि कडक उन्हात मिळणाऱ्‍या गार पाण्याच्या पेल्यासारखा उत्साहवर्धक वाटला. (मत्तय ११:२८, २९) पण लावदिकीयातील ख्रिस्ती तर उष्ण नाहीत आणि शीतही नाहीत. त्यांच्या शहरात वाहत येणाऱ्‍या पाण्याप्रमाणे ते कोमट झालेले होते. यामुळे ते येशूकडून पूर्णपणे नाकारले जाण्याच्या, ‘त्याच्या तोंडातून ओकले जाण्याच्या’ बेतात आले होते! यास्तव, आपण आपल्यापरीने येशूप्रमाणेच दुसऱ्‍यांना आध्यात्मिक तजेला देण्यासाठी आपला कार्यभाग आवेशाने पूर्ण करीत राहू या.—मत्तय ९:३५-३८.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा