वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • पहिला अनर्थ—टोळ
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • ९. त्या टोळांना लढाईच्या कसल्या सूचना मिळाल्या?

      ९ त्या टोळांना लढाईसंबंधाने कोणत्या सूचना मिळतात? योहान कळवतो: “त्यांस असे सांगण्यात आले की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याहि हिरवळीला व कोणत्याहि झाडाला उपद्रव करु नये; तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जिवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्‍त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते; त्यापासून होणारी पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्‍या पीडेसारखी होती. त्या दिवसात माणसे मरणाची संधि शोधतील तरी ती त्यांना येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.”—प्रकटीकरण ९:४-६.

  • पहिला अनर्थ—टोळ
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • ११. (अ) ते टोळ देवाच्या शत्रूंना किती काळ पीडा देणार आणि हा थोडा काळ का नाही? (ब) ही पीडा केवढी तीव्र आहे?

      ११ ती पीडा पाच महिन्यासाठी होती असे सांगण्यात आले. तुलनात्मकरित्या हा खूपच कमी काळ वाटतो का? खरोखरीच्या टोळाच्या दृष्टीने पाहिल्यास, तो तसा वाटत नाही. पाच महिने या किटकांचा सर्वसाधारण आयुष्याचा काळ असतो. या कारणास्तव, आधुनिक टोळ आपल्या हयातीभर देवाच्या शत्रूंना दंश देत राहतात. ही पीडा इतकी तीव्र आहे की, लोकांना मरण कधी येईल असे वाटते. हे खरे की, ज्यांना टोळांनी बाधा केली आहे अशांनी खरोखरीच आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असा कसलाही अहवाल नाही. पण हा दाखला त्या पीडेची तीव्रता आपल्या लक्षात आणतो—तो दंश जणू विंचवांनी पराकाष्ठेने केलेला दंश होय. ही पीडा, यिर्मया संदेष्ट्याने अविश्‍वासू इस्राएल लोकांना मिळणाऱ्‍या त्रासाबद्दल जे पूर्वदृश्‍य पाहिले होते, त्यासारखी आहे. त्यांची बाबेलोनी विजेत्यांमार्फत पांगापांग केली जाणार होती आणि त्यांना जगण्यापेक्षा मरणे बरे, असे वाटणार होते.—यिर्मया ८:३; तसेच उपदेशक ४:२, ३ देखील पहा.

      १२. टोळांना, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्‍यांना आध्यात्मिक अर्थाने पीडा देण्याचे, पण ठार न मारण्याचे का सांगण्यात आले?

      १२ त्यांना आध्यात्मिक रितीने केवळ पीडा देण्याचे व ठार न करण्याचे का सोपवले होते? हा तर केवळ सुरवातीचा अनर्थ आहे, ज्यात ख्रिस्ती धर्मजगताच्या लबाड्या व त्याचे अपयश हे उघड करण्यात आले आहे; नंतर, प्रभूच्या दिवसात पुढे गेल्यावर त्याची मरणप्राय आध्यात्मिक स्थिती पूर्णपणे जाहीर केली जाणार होती. दुसऱ्‍या अनर्थाच्या वेळी एकतृतीयांश माणसांचा संहार होतो.—प्रकटीकरण १:१०; ९:१२, १८; ११:१४.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा