वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो
    टेहळणी बुरूज—२००२ | मार्च १५
    • ५, ६. (अ) प्रेषित योहानाला मिळालेल्या एका दृष्टान्तात “सोन्याच्या सात समया” आणि “सात तारे” कशाला सूचित करतात? (ब) “सात तारे” येशूच्या उजव्या हातात आहेत यावरून काय समजते?

      ५ प्रकटीकरणाचे पुस्तक दाखवते की विश्‍वासू व बुद्धिमान दास येशू ख्रिस्ताच्या थेट नियंत्रणाखाली आहे. ‘प्रभूच्या दिवसाविषयीच्या’ दृष्टान्तात, “सोन्याच्या सात समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, . . . कोणीएक [प्रेषित योहानाच्या] दृष्टीस पडला. . . . त्याच्या उजव्या हातात सात तारे होते.” योहानाला हा दृष्टान्त समजावून सांगताना येशूने म्हटले: “जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ह्‍या सात मंडळ्या आहेत.”—प्रकटीकरण १:१, १०-२०.

      ६ “सोन्याच्या सात समया” १९१४ साली सुरू झालेल्या ‘प्रभूच्या दिवसात’ अस्तित्वात असलेल्या सर्व खऱ्‍या ख्रिस्ती मंडळ्यांना सूचित करतात. पण “सात तारे” काय सूचित करतात? सुरवातीला ते पहिल्या शतकातील मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍या, सर्व आत्म्याने जन्म घेतलेल्या अभिषिक्‍त पर्यवेक्षकांना सूचित करत होते.a हे पर्यवेक्षक येशूच्या उजव्या हातात, अर्थात त्याच्या नियंत्रणात व मार्गदर्शनाखाली होते. होय, येशू त्या संयुक्‍त दास वर्गाचे नेतृत्व करत होता. पण आता मात्र अभिषिक्‍त पर्यवेक्षकांची संख्या कमी आहे. मग ख्रिस्त आज सबंध पृथ्वीवरील यहोवाच्या साक्षीदारांच्या ९३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांचे कशाप्रकारे नेतृत्व करत आहे?

      ७. (अ) येशू सबंध पृथ्वीवरील मंडळ्यांचे नेतृत्व करण्याकरता नियमन मंडळाचा कशाप्रकारे उपयोग करत आहे? (ब) ख्रिस्ती पर्यवेक्षक पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केले जातात असे का म्हणता येईल?

      ७ पहिल्या शतकाप्रमाणेच आजही अभिषिक्‍त पर्यवेक्षकांपैकी सुयोग्य बांधवांचा एक लहानसा गट नियमन मंडळ या नात्याने विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या संयुक्‍त गटाचे प्रतिनीधीत्व करतो. आपला नेता, स्थानिक मंडळीत वडील या नात्याने सेवा करण्याकरता सुयोग्य पुरुषांना नेमण्याकरता या नियमन मंडळाचा उपयोग करतो, मग ते आत्म्याने अभिषिक्‍त असोत वा नसोत. या संदर्भात, यहोवाने येशूला ज्याचा वापर करण्याचा अधिकार दिला आहे, तो पवित्र आत्मा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. (प्रेषितांची कृत्ये २:३२, ३३) सर्वप्रथम या पर्यवेक्षकांनी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असलेल्या देवाच्या वचनात दिलेल्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९; २ पेत्र १:२०, २१) या पर्ववेक्षकांची शिफारस आणि नेमणूक प्रार्थना केल्यानंतर आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. शिवाय, नेमलेल्या व्यक्‍ती पवित्र आत्म्याचे फळ उत्पन्‍न करत असल्याचा पुरावा देतात. (गलतीकर ५:२२, २३) त्याअर्थी पौलाचा पुढील सल्ला सर्व वडिलांना तितक्याच जोरदारपणे लागू होतो, मग ते अभिषिक्‍त असोत वा नसोत: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्‍यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.” (प्रेषितांची कृत्ये २०:२८) या नियुक्‍त पुरुषांना नियमन मंडळाकडून मार्गदर्शन मिळते आणि ते स्वखुषीने मंडळीचे पालन करतात. अशा रितीने, ख्रिस्त आज आपल्याबरोबर आहे आणि मंडळीचे सक्रियपणे नेतृत्व करत आहे.

  • ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो
    टेहळणी बुरूज—२००२ | मार्च १५
    • a “तारे” याठिकाणी खऱ्‍या देवदूतांना सूचित करत नाहीत. येशूने या अदृश्‍य आत्मिक प्राण्यांकरता असलेली माहिती एका मानवाकडून निश्‍चितच लिहून घेतली नसती. त्याअर्थी, “तारे” मानवी पर्यवेक्षकांना, म्हणजेच मंडळीतल्या वडिलांना सूचित करत असावेत, जे येशूचे दूत आहेत. त्यांची सात ही संख्या देवाने ठरवलेल्या पूर्णतेस सूचित करते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा