-
ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतोटेहळणी बुरूज—२००३ | मे १५
-
-
७, ८. इफिस येथील मंडळीत कोणती गंभीर समस्या होती आणि आपण अशा परिस्थितीला कसे तोंड देऊ शकतो?
७ तरीसुद्धा, इफिस येथील ख्रिश्चनांना एक गंभीर समस्या होती. येशूने म्हटले: “तू आपली पहिली प्रीति सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” या मंडळीच्या सदस्यांना, यहोवाबद्दल सुरवातीला वाटणारे प्रेम पुन्हा जागृत करणे गरजेचे होते. (मार्क १२:२८-३०; इफिसकर २:४; ५:१, २) आपण स्वतः देखील देवाबद्दल आपल्याला वाटणारे पहिले प्रेम गमवण्यापासून सांभाळले पाहिजे. (३ योहान ३) पण भौतिक धन किंवा सुखविलास यांसारख्या गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान घेऊ लागल्या असतील तर आपण काय करावे? (१ तीमथ्य ४:८; ६:९, १०) अशा इच्छाआकांक्षांऐवजी आपल्या मनात यहोवाबद्दल उत्कट प्रेम आणि त्याने व त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे काही केले त्याबद्दल कृतज्ञता उत्पन्न करण्यास मदत मिळावी म्हणून आपण कळकळीने प्रार्थना केली पाहिजे.—१ योहान ४:१०, १६.
-
-
ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतोटेहळणी बुरूज—२००३ | मे १५
-
-
११. आपण यहोवाविषयीचे प्रेम वृद्धिंगत करण्यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतो?
११ इफिसकर ख्रिश्चनांनी आपली पहिली प्रीती गमावली होती, पण आजच्या काळात एखाद्या मंडळीत अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर? यहोवाच्या प्रेमळ कार्यांविषयी आपल्या बांधवांशी बोलण्याद्वारे आपण त्याच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत करण्याचा वैयक्तिक प्रयत्न करावा. देवाने आपला प्रिय पुत्र खंडणीकरता देऊन जी महान प्रीती दाखवली तिच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. (योहान ३:१६; रोमकर ५:८) मंडळीच्या सभांमध्ये उत्तरे देताना किंवा आपले भाग सादर करताना, योग्य ठिकाणी आपण देवाच्या प्रीतीचा उल्लेख करू शकतो. ख्रिस्ती सेवाकार्यात देखील यहोवाच्या नावाची स्तुती करण्याद्वारे आपण त्याच्याबद्दल आपले वैयक्तिक प्रेम व्यक्त करू शकतो. (स्तोत्र १४५:१०-१३) होय, आपले शब्द व कृती मंडळीची पहिली प्रीती पुन्हा जागृत करण्यात अथवा ती वृद्धिंगत करण्यात बराच हातभार लावू शकतात.
-