वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • १७. (अ) श्‍वापदाच्या राज्याला जो आध्यात्मिक अंधकार सातत्याने घेरून आहे त्याचा पाचवी वाटी ओतल्याशी कसा संबंध आहे? (ब) देवाच्या क्रोधाची पाचवी वाटी ओतण्यामुळे लोक कशी प्रतिक्रिया दाखवतात?

      १७ या श्‍वापदाचे राज्य आरंभापासूनच आध्यात्मिक अंधःकारात राहिले आहे. (पडताळा मत्तय ८:१२; इफिसकर ६:११, १२.) पाचवी वाटी या अंधःकाराची प्रखर जाहीर घोषणा करते. त्यात नाट्यमय कृतीही करण्यात येते म्हणजेच, देवाच्या क्रोधाची वाटी लाक्षणिक श्‍वापदाच्या प्रत्यक्ष आसनावर ओतण्यात येते. “तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले, आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही.”—प्रकटीकरण १६:१०ब, ११.

  • देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • १९. सैतानाला या व्यवस्थीकरणाचा देव असे जाहीरपणे उघड करून दाखवण्यात आल्यामुळे प्रकटीकरण १६:१०, ११ च्या अनुषंगाने कोणता परिणाम घडतो?

      १९ सैतानाने जागतिक अधिपती या नात्याने पुष्कळ दुःख व त्रास दिला आहे. दुष्काळ, युद्धे, हिंसाचार, गुन्हे, मादक औषधांचा अतिरेक, अनैतिकता, लैंगिकदृष्ट्या संक्रमित होणारे आजार, अप्रामाणिकता, धार्मिक ढोंगीपणा—या सर्व सैतानी व्यवस्थीकरणाच्या छाप देणाऱ्‍या गोष्टी आहेत. (पडताळा गलतीकर ५:१९-२१.) याचप्रमाणे, सैतान हा या व्यवस्थीकरणाचा देव आहे हे जाहीरपणे उघड करण्यात आल्यामुळे देखील त्याच्या दर्जांनुरुप राहणाऱ्‍यांना यातना मिळत आहेत. खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील “लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या.” सत्यामुळे त्यांची राहणीमानाची जी पद्धत उघड केली जाते तिजमुळे पुष्कळांना राग येतो. काहींना ती दहशत वाटते म्हणून ते, ती प्रसिद्ध करणाऱ्‍यांचा छळ करतात. ते देवाच्या राज्याला धिक्कारतात आणि यहोवाच्या पवित्र नामाची निंदा करतात. त्यांची धार्मिक दृष्ट्या आजारी व रोगग्रस्त स्थिती उघड झाली यासाठी ते स्वर्गाच्या देवाची निंदा करतात. ते ‘आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप करीत नाहीत.’ यामुळे या व्यवस्थीकरणाच्या नाशाआधी प्रचंड समुदायाचे परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा आम्ही धरू शकत नाही.—यशया ३२:६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा