वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • ११. लाक्षणिक किरमिजी रंगाच्या श्‍वापदाच्या दहा शिंगांबद्दल यहोवाचा देवदूत काय सांगतो?

      ११ प्रकटीकरणाच्या पूर्वीच्या अध्यायात, सहाव्या व सातव्या देवदूतांनी देवाच्या क्रोधाच्या वाट्या ओतल्या. त्यावेळी आम्हास सांगितले गेले होते की पृथ्वीचे राजे, देवाची लढाई हर्मगिदोनासाठी एकत्रित केले जातील व ‘देवासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात येईल.’ (प्रकटीकरण १६:१, १४, १९) आता आपण देवाचे न्यायदंड त्याजवर कशारितीने बजावले जाणार आहेत त्याची विस्तृत माहिती शिकणार आहोत. यहोवाचा देवदूत योहानाला पुढे जे सांगतो ते ऐका: “जी दहा शिंगे तू पाहिली ती दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही; तरी त्यांना श्‍वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो. ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्‍वापदाला देतात. हे कोकऱ्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील कारण तो ‘प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा’ आहे आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू आहेत. [तेही विजय मिळवतील, NW]”—प्रकटीकरण १७:१२-१४.

  • मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • १३. कशारितीने ती दहा शिंगे ‘एकविचाराची’ आहेत व हे, कोकऱ्‍याबद्दल ठामपणे कोणती प्रवृत्ती असल्याची खात्री देते?

      १३ आज ह्‍या दहा शिंगांना प्रवृत्त करणारी बलवान शक्‍ती म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. देवाच्या राज्याचा स्वीकार करण्यापेक्षा त्यांची राष्ट्रीय प्रभुसत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात ते ‘एकविचारी’ आहेत. लिग ऑफ नेशन्स व संयुक्‍त राष्ट्रसंघाला आपली मान्यता दाखविण्यामध्ये त्यांचा हाच हेतू होता की,—जागतिक शांती टिकवण्याचा प्रयत्न करावा व त्यांच्या अस्तित्वाचे संरक्षण करावे. अशी प्रवृत्ती ठामपणे खात्री पुरविते की, ही शिंगे “प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा” असणाऱ्‍या कोकऱ्‍यास विरोध करतील, कारण यहोवाने उद्देशिल्यानुसार, येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखालील राज्य, ह्‍या सर्व राष्ट्रांची थोड्याच वेळात जागा घेईल.—दानीएल ७:१३, १४; मत्तय २४:३०; २५:३१-३३, ४६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा