वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ५
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • ५

      • हनन्या व सप्पीरा (१-११)

      • प्रेषित अनेक चमत्कार करतात (१२-१६)

      • तुरुंगवास आणि सुटका (१७-२१क)

      • पुन्हा न्यायसभेसमोर (२१ख-३२)

        • माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळा (२९)

      • गमलियेलचा सल्ला (३३-४०)

      • घरोघर प्रचार (४१, ४२)

प्रेषितांची कार्यं ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ६

    ७/१/२००६, पृ. १९

प्रेषितांची कार्यं ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३५

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ६

    ७/१/२००६, पृ. १९

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ५:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३७-३८

प्रेषितांची कार्यं ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९०, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३८

प्रेषितांची कार्यं ५:१८

तळटीपा

  • *

    किंवा “अटक करून.”

प्रेषितांची कार्यं ५:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३८

प्रेषितांची कार्यं ५:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “या जीवनाचा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३८

प्रेषितांची कार्यं ५:२१

तळटीपा

  • *

    अर्थात, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं ५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२०, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ५:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२०, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ५:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३६, ३९

प्रेषितांची कार्यं ५:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३७

प्रेषितांची कार्यं ५:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३९

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. १२-१३

    ११/१/२००२, पृ. १८-१९

    ११/१/१९८८, पृ. २९

प्रेषितांची कार्यं ५:३०

तळटीपा

  • *

    किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं ५:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५३५

प्रेषितांची कार्यं ५:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ३/२००१, पृ. ३

प्रेषितांची कार्यं ५:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४०

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. ३०-३१

प्रेषितांची कार्यं ५:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४०

प्रेषितांची कार्यं ५:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४०

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. १३-१६

प्रेषितांची कार्यं ५:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४०-४१

प्रेषितांची कार्यं ५:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४१-४२

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९२, पृ. २३

    ३/१/१९८८, पृ. २५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं ५:१-४२

प्रेषितांची कार्यं

५ तेव्हा, हनन्या नावाचा एक मनुष्य व त्याची बायको सप्पीरा यांनीही आपल्या मालकीची काही जमीन विकली. २ पण, त्याने मिळालेल्या पैशांतून काही पैसे आपल्याजवळच ठेवले आणि त्याच्या पत्नीलाही याविषयी माहीत होते. मग त्याने बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या पायांजवळ ठेवले. ३ तेव्हा पेत्र त्याला म्हणाला: “हनन्या, शेताच्या पैशांतले काही स्वतःजवळच ठेवून, पवित्र आत्म्याशी खोटं बोलण्याइतकं सैतानाने तुला धीट कसं काय बनवलं? ४ ते शेत विकण्याआधी तुझ्याच मालकीचं नव्हतं का? आणि ते विकल्यानंतरही त्या पैशांवर तुझाच अधिकार नव्हता का? मग तू असं काम करण्याचा विचार मनात का आणलास? तू माणसांशी नाही तर देवाशी खोटं बोलला आहेस.” ५ हे शब्द ऐकताच हनन्या खाली कोसळला आणि मेला. आणि ज्यांनी ज्यांनी याविषयी ऐकले त्या सर्वांच्या मनात मोठी भीती बसली. ६ मग तरुणांनी उठून त्याला कापडांत गुंडाळले आणि बाहेर नेऊन पुरले.

७ सुमारे तीन तासांनंतर त्याची बायको तिथे आली. पण, काय घडले आहे हे तिला माहीत नव्हते. ८ पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही ते शेत इतक्याच किंमतीत विकलं का?” ती म्हणाली: “हो, इतक्याच किंमतीत.” ९ तेव्हा पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही दोघांनी मिळून यहोवाच्या* आत्म्याची परीक्षा पाहायचं का ठरवलं? पाहा! ज्यांनी तुझ्या नवऱ्‍याला पुरलं ते दाराजवळच आहेत आणि ते तुलाही बाहेर नेतील.” १० त्याच क्षणी ती त्याच्या पायांजवळ कोसळली आणि मेली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्‍याच्या शेजारी पुरले. ११ या घटनेमुळे मंडळीतल्या बांधवांना आणि ज्यांनी याविषयी ऐकले त्या सर्वांना मोठी भीती वाटली.

१२ प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुढे आणखी बरीच चिन्हे व चमत्कार घडले; आणि ते सर्व शलमोनच्या वरांड्यात एकत्र जमायचे. १३ त्यांच्यात सामील होण्याचे आणखी कोणाचेही धैर्य होत नव्हते, पण सर्व लोक त्यांच्याविषयी खूप आदराने बोलायचे. १४ शिवाय, प्रभूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या वाढत गेली आणि पुरुष व स्त्रियांचीही त्यांच्यात भर पडतच राहिली. १५ लोक तर आजारी माणसांना पलंगांवर व अंथरूणांवर आणून मुख्य रस्त्यांवर ठेवायचे. पेत्र तिथून जाताना निदान त्याची सावली त्यांच्यावर पडेल या आशेने ते असे करायचे. १६ तसेच, यरुशलेमच्या आसपासच्या शहरांतूनही मोठ्या संख्येने लोक आजारी माणसांना व दुरात्म्यांनी पीडित असलेल्यांना आणायचे आणि ते सर्व जण बरे व्हायचे.

१७ तेव्हा, महायाजक आणि त्याच्यासोबत सदूकी पंथाचे जितके लोक होते, ते सर्व मत्सराने पेटून उठले. १८ आणि त्यांनी प्रेषितांना धरून* तुरुंगात टाकले. १९ पण रात्री यहोवाच्या* दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यांना बाहेर आणले व म्हटले: २० “मंदिरात जा आणि लोकांना जीवनाचा* संदेश सांगत राहा.” २१ म्हणून, दिवस उजाडल्यावर ते मंदिरात जाऊन लोकांना शिकवू लागले.

मग, महायाजक व त्याच्यासोबतचे लोक आले, तेव्हा त्यांनी न्यायसभेच्या* सदस्यांना आणि इस्राएली लोकांच्या सर्व वडील जनांना एकत्र केले आणि त्यांनी प्रेषितांना त्यांच्यासमोर हजर करण्यासाठी काही माणसांना तुरुंगाकडे पाठवले. २२ पण ती माणसे तुरुंगात आली तेव्हा त्यांना प्रेषित तिथे सापडले नाहीत. त्यामुळे ते परत आले आणि म्हणाले: २३ “आम्हाला तुरुंगाचे दरवाजे कुलूप लावून नीट बंद केलेले आढळले आणि दरवाजांवर पहारेकरीदेखील उभे असलेले आढळले, पण दरवाजे उघडल्यावर आम्हाला आत कोणीच सापडलं नाही.” २४ मंदिराचा अधिकारी आणि मुख्य याजक यांनी हे ऐकले तेव्हा ते गोंधळात पडले आणि आता पुढे काय होईल याचा विचार करू लागले. २५ पण इतक्यात एक जण तिथे येऊन म्हणाला: “पाहा! तुम्ही ज्या माणसांना तुरुंगात टाकलं होतं, ते मंदिरात उभे राहून लोकांना शिकवत आहेत.” २६ तेव्हा अधिकारी आपल्या शिपायांसोबत तिथे गेला आणि ते त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. पण शिपायांनी त्यांना मारहाण केली नाही कारण लोक आपल्याला दगडमार करतील अशी भीती त्यांना होती.

२७ मग त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा, महायाजकाने त्यांना काही प्रश्‍न विचारले व तो म्हणाला: २८ “या नावाने लोकांना न शिकवण्याची आम्ही तुम्हाला सक्‍त ताकीद दिली होती. पण, पाहा! तुम्ही तर सबंध यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत आणि या मनुष्याच्या रक्‍ताचा दोष आमच्या माथी आणण्याचा तुम्ही जणू निर्धारच केला आहे!” २९ तेव्हा पेत्र व इतर प्रेषित यांनी उत्तर दिले: “आम्ही माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे. ३० ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर* लटकवून ठार मारलं, त्याला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठवलं. ३१ इस्राएलला पश्‍चात्ताप करायला व आपल्या पापांची क्षमा मिळवायला साहाय्य करावं, म्हणून देवाने येशूला आपला मुख्य प्रतिनिधी आणि तारण करणारा म्हणून उंचावून, आपल्या उजव्या हाताला बसवलं आहे. ३२ आणि आम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहोत आणि देवाला आपला शासक म्हणून जे स्वीकारतात त्यांना त्याने दिलेला पवित्र आत्मादेखील या गोष्टींचा साक्षीदार आहे.”

३३ हे ऐकून ते खूप संतापले आणि त्यांना ठार मारण्याचा विचार करू लागले. ३४ पण, त्या वेळी गमलियेल नावाचा एक परूशी न्यायसभेत उठून उभा राहिला; तो नियमशास्त्राचा शिक्षक असून सर्व जण त्याचा आदर करायचे. त्याने प्रेषितांना काही वेळ बाहेर पाठवण्याची आज्ञा दिली. ३५ मग तो इतरांना म्हणाला: “इस्राएलच्या लोकांनो, या माणसांसोबत जे काही कराल ते विचारपूर्वक करा. ३६ कारण काही दिवसांपूर्वी थुदास नावाचा एक माणूस उठला होता. आपण कोणीतरी आहोत असं तो सांगत होता आणि बरेच, म्हणजे जवळजवळ चारशे जण त्याच्या गटात सामील झाले. पण तो मारला गेला आणि त्याच्यामागे चालणाऱ्‍यांची पांगापाग झाली आणि शेवटी त्याचं काहीच उरलं नाही. ३७ मग त्याच्यानंतर नावनोंदणीच्या दिवसांत गालीलचा यहूदादेखील उठला होता आणि त्यानेही काही माणसांना आपल्यामागे ओढले. पण त्या माणसाचाही नाश झाला आणि त्याच्यामागे जाणाऱ्‍यांची पांगापांग झाली. ३८ म्हणूनच, आताही मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या माणसांच्या भानगडीत पडू नका, तर त्यांना जाऊ द्या. कारण ही योजना किंवा हे कार्य माणसांचं असेल तर ते नष्ट होईल; ३९ पण जर का ते देवाचं असेल, तर तुम्ही त्यांच्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाही. शिवाय, तुम्ही खुद्द देवाशी लढणारे ठराल.” ४० तेव्हा त्यांनी त्याचा सल्ला मानला आणि प्रेषितांना बोलावून त्यांना फटके मारले आणि येशूच्या नावाने न बोलण्याची आज्ञा देऊन त्यांना जाऊ दिले.

४१ तेव्हा, आपल्याला येशूच्या नावासाठी अनादर करण्याच्या लायकीचे समजण्यात आले, म्हणून ते आनंद करत न्यायसभेतून बाहेर गेले. ४२ आणि दररोज मंदिरात आणि घरोघर जाऊन लोकांना शिकवण्यात व ख्रिस्त, अर्थात येशू याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा