वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ६
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ६

      • ख्रिस्ती बांधवांमध्ये न्यायालयीन खटले (१-८)

      • असे लोक देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत (९-११)

      • आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा (१२-२०)

        • “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर पळा!” (१८)

१ करिंथकर ६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. ३०

१ करिंथकर ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९५, पृ. २०

१ करिंथकर ६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. ६

    ३/१५/१९९७, पृ. २१-२२

    ३/१५/१९९६, पृ. १५

    ५/१/१९९५, पृ. ३०

१ करिंथकर ६:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा, “अनैतिक लैंगिक कृत्ये.”

  • *

    हे समलैंगिक संबंधात स्त्रीसारखा संभोग देणाऱ्‍या पुरुषांना सूचित करते.

  • *

    किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

१ करिंथकर ६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

१ करिंथकर ६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१०, पृ. ९-१०

    ४/१५/२०१०, पृ. ९

१ करिंथकर ६:१२

तळटीपा

  • *

    किंवा “मला सर्व गोष्टींची परवानगी आहे.”

  • *

    किंवा “गोष्टीचा स्वतःवर अधिकार चालू देणार नाही.”

१ करिंथकर ६:१३

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

१ करिंथकर ६:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “तो त्याच्यासोबत आत्म्यात एक आहे.”

१ करिंथकर ६:१८

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २७

    ६/१५/२००८, पृ. १०

    २/१५/२००४, पृ. १२-१४

    ९/१/१९९९, पृ. १२-१३

    पृ. ३३

१ करिंथकर ६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००५, पृ. १३-१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर ६:१-२०

१ करिंथकर

६ तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्‍यासोबत काही वाद होतो, तेव्हा तो सोडवण्यासाठी पवित्र जनांसमोर न जाता तुम्ही न्यायालयात अनीतिमान माणसांसमोर जाण्याचे कसे काय धाडस करता? २ पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहीत नाही का? आणि जर तुम्ही जगाचा न्याय करणार आहात, तर मग अगदी लहानसहान गोष्टींविषयी न्यायनिवाडा करण्याची योग्यता तुमच्यात नाही का? ३ आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? मग सध्याच्या जीवनातल्या सर्वसाधारण समस्या आपण का सोडवू शकत नाही? ४ आणि सध्याच्या जीवनातले प्रश्‍न सोडवायचे असतात, तेव्हा मंडळी ज्यांचा आदर करत नाही, अशांना तुम्ही न्यायाधीश म्हणून का निवडता? ५ तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे. आपल्या बांधवांमध्ये न्याय करू शकेल असा एकही बुद्धिमान माणूस तुमच्यात नाही का? ६ त्याऐवजी एक भाऊ दुसऱ्‍याला न्यायालयात ओढतो, आणि तेसुद्धा विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांपुढे!

७ तुम्ही एकमेकांविरुद्ध खटले भरता याचा अर्थ खरेतर तुम्ही पूर्णपणे हरला आहात. त्याऐवजी, तुम्ही स्वतःचे नुकसान का होऊ देत नाही? त्याऐवजी, तुम्ही स्वतःची फसवणूक का होऊ देत नाही? ८ उलट, तुम्ही स्वतःच दुसऱ्‍याचे नुकसान व फसवणूक करता, आणि तीसुद्धा आपल्याच भावांची!

९ अनीतिमान माणसे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का? फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्ये* करणारे, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्‍या,* समलैंगिक कृत्ये करणारे पुरुष,* १० चोर, लोभी, दारुडे, शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत. ११ तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आले आहे; तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे; प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे व आपल्या देवाच्या आत्म्याद्वारे तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आले आहे.

१२ माझ्यासाठी सर्व गोष्टी कायदेशीर आहेत,* पण सर्वच गोष्टी हिताच्या नाहीत. माझ्यासाठी सर्व गोष्टी कायदेशीर असल्या, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.* १३ अन्‍न पोटासाठी आणि पोट अन्‍नासाठी आहे, पण देव या दोन्ही गोष्टी नाहीशा करेल. शरीर हे अनैतिक लैंगिक कृत्यांसाठी* नाही, तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे. १४ पण देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्यालाही मरणातून उठवेल.

१५ तुमची शरीरे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? मग मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव एका वेश्‍येच्या शरीराशी जोडावेत का? मुळीच नाही! १६ जो कोणी वेश्‍येशी संबंध ठेवतो तो तिच्यासोबत एकदेह होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? कारण “ती दोघे एकदेह होतील,” असे देव म्हणतो. १७ पण जो कोणी प्रभूसोबत ऐक्यात असतो, त्याची मनोवृत्ती प्रभूसारखीच होते.* १८ अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* दूर पळा! मनुष्याने दुसरे कोणतेही पाप केल्यास ते तो आपल्या शरीराबाहेर करतो, पण जो कोणी अनैतिक लैंगिक कृत्ये करत राहतो, तो स्वतःच्याच शरीराच्या विरोधात पाप करत असतो. १९ तुमचे शरीर हे तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या देवाकडील पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? तसेच, तुमची स्वतःवर मालकी नाही, २० कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आले आहे. म्हणून आपल्या शरीराद्वारे सर्व प्रकारे देवाचा गौरव करा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा