स्तोत्र
दावीदचं गीत.
३ माझा पाठलाग करणाऱ्यांविरुद्ध तुझा भाला आणि कुऱ्हाड* उचल.+
“मी तुझं तारण करणारा आहे,” असं मला म्हण.+
४ माझ्या जिवावर उठलेल्यांना लज्जित आणि अपमानित होऊ दे.+
माझा नाश करण्याचं षड्यंत्र रचणाऱ्यांना, शरमेने माघार घ्यायला लाव.
५ त्यांना वाऱ्यावर उडून जाणाऱ्या भुशासारखं होऊ दे;
यहोवाचा स्वर्गदूत त्यांना हाकलून लावो.+
६ यहोवाचा स्वर्गदूत त्यांचा पाठलाग करेल
तेव्हा त्यांच्या वाटेवर अंधार होऊ दे आणि त्यांचा पाय घसरू दे.
७ कारण त्यांनी विनाकारण मला पकडण्यासाठी जाळं लपवून ठेवलंय;
त्यांनी विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणलाय.
८ त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांच्यावर संकट कोसळू दे;
त्यांनी लपवलेल्या जाळ्यात त्यांनाच अडकू दे;
त्यात पडून त्यांचा नाश होऊ दे.+
९ पण मी* यहोवामुळे आनंद करीन;
त्याच्या तारणाच्या कार्यांमुळे मी हर्षित होईन.
१० माझी सगळी हाडं म्हणतील:
“हे यहोवा, तुझ्यासारखा कोण आहे?
तू बलवानांच्या हातून असाहाय्य लोकांना वाचवतोस,+
निराधार आणि गरीब लोकांना तू लुबाडणाऱ्यांपासून वाचवतोस.”+
१३ ते आजारी पडले, तेव्हा मी गोणपाट पांघरलं;
मी उपास करून माझ्या जिवाला त्रास दिला.
आणि मी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं जेव्हा उत्तर मिळालं नाही,
१४ तेव्हा एखादा मित्र किंवा स्वतःचा भाऊ गेल्यासारखा, मी शोक करत फिरलो;
आईसाठी शोक करणाऱ्यासारखा मी दुःखाने वाकलो.
१५ पण जेव्हा मी अडखळलो, तेव्हा त्यांनी एकत्र जमून आनंद साजरा केला;
माझ्यावर अचानक हल्ला करण्यासाठी ते सगळे टपून बसले;
त्यांनी माझ्या चिंधड्या उडवल्या; ते गप्प बसले नाहीत.
१७ हे यहोवा, तू कधीपर्यंत नुसताच बघत राहशील?+
१८ मग मी मोठ्या मंडळीत तुझी उपकारस्तुती करीन;+
आणि लोकांच्या समुदायात तुझं गुणगान करीन.
१९ विनाकारण माझे शत्रू बनलेल्यांना, माझ्या संकटाबद्दल आनंद करू देऊ नकोस;
विनाकारण माझा द्वेष करणाऱ्यांना,+ दुष्टपणे डोळे मिचकावू देऊ नकोस.+
२० कारण ते शांतीच्या गोष्टी करत नाहीत,
तर देशातल्या शांतिप्रिय लोकांविरुद्ध दुष्ट योजना करत राहतात.+
२१ ते मोठमोठ्याने हसून माझ्यावर आरोप लावतात,
ते म्हणतात, “हो, तूच केलंस! आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं.”
२२ हे यहोवा, तू हे पाहिलं आहेस. म्हणून गप्प बसू नकोस.+
हे यहोवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+
२३ ऊठ आणि माझ्या वतीने लढ.
हे यहोवा, माझ्या देवा, माझ्या बाजूने वाद कर.
२४ हे यहोवा, माझ्या देवा, तू नीतिमान आहेस. तूच माझा न्याय कर;+
त्यांना माझ्या संकटाबद्दल आनंद करू देऊ नकोस.
२५ “बरं झालं! आपल्याला हवं होतं, तसंच घडलं,” असं म्हणण्याची त्यांना कधी संधी देऊ नकोस.
“आम्ही त्याला गिळून टाकलं,” असं त्यांना म्हणू देऊ नकोस.+
२६ जे माझ्या संकटाबद्दल आनंद करतात,
त्या सर्वांना लज्जित आणि अपमानित होऊ दे.
माझ्यावर मोठेपणा मिरवणारे शरमेने आणि अपमानाने झाकले जावोत.
२७ पण माझ्या नीतिमत्त्वाबद्दल आनंद करणाऱ्यांना जल्लोष करू दे;
त्यांनी सतत असं म्हणावं:
“यहोवाचा गौरव असो. त्याच्या सेवकाला शांती मिळाल्याने त्याला आनंद होतो.”+
२८ मग मी आपल्या जिभेने तुझ्या नीतिमत्त्वाचं वर्णन करीन.*+
मी दिवसभर तुझी स्तुती करीन.+