१४ इतकंच नाही, तर नबुखद्नेस्सरने जी सोन्याचांदीची भांडी यरुशलेमच्या मंदिरातून आणून बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने तिथून बाहेर काढली.+ कोरेशने राज्यपाल म्हणून नेमलेल्या शेशबस्सर*+ नावाच्या माणसाकडे, ती सर्व भांडी देण्यात आली.
१दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, यहूदाचा राज्यपाल, म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा यांना संदेष्टा हाग्गय*+ याच्याकडून यहोवाचा* हा संदेश मिळाला:
१४ मग यहोवाने यहूदाचा राज्यपाल+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि यहोसादाकचा मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा,+ तसंच बाकीचे सर्व लोक यांच्या मनाला प्रेरणा दिली.+ तेव्हा त्या सर्वांनी येऊन आपला देव, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.+
२३ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘हे जरूब्बाबेल,+ शल्तीएलच्या मुला,+ माझ्या सेवका, त्या दिवशी मी तुला बोलवीन.’ यहोवा म्हणतो, ‘मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखा करीन, कारण मी तुलाच निवडलं आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”