-
२ इतिहास ३०:८, ९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ आता आपल्या वाडवडिलांसारखं अडेलपणे वागू नका.+ यहोवाच्या अधीन व्हा आणि जे मंदिर यहोवाने कायमसाठी पवित्र केलंय, तिथे येऊन तुमच्या देवाची उपासना करा.+ म्हणजे तुमच्यावर भडकलेला त्याचा क्रोध शांत होईल.+ ९ तुम्ही यहोवाकडे परत आलात, तर तुमच्या भावांना आणि मुलांना ज्या लोकांनी बंदी बनवून नेलंय ते त्यांना दया दाखवतील+ आणि त्यांना आपल्या देशात परत येऊ देतील.+ कारण तुमचा देव यहोवा हा करुणामय* आणि दयाळू आहे.+ म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत आलात, तर तो तुमच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.”+
-
-
सफन्या २:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ हुकूम अंमलात येण्याआधी,
आणि दिवस भुशासारखा उडून जाण्याआधी,
यहोवाचा भयानक क्रोध तुमच्यावर येण्याआधी,+
आणि यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याआधी,
३ अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,
देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्यांनो,
यहोवाला शोधा.+
नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.*
म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+
-