३९ मग तिथून जरासं पुढे जाऊन त्याने गुडघे टेकले आणि जमिनीपर्यंत वाकून तो अशी प्रार्थना करू लागला:+ “माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला+ माझ्यापासून काढून घे. तरी, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+
३८ पण येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी पीत आहे तो तुम्हाला पिता येईल का? आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तो तुम्हाला घेता येईल का?”+
३६ मग तो म्हणाला: “अब्बा,* बापा,+ तुला सगळं काही शक्य आहे. म्हणून हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+