वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २१:२३-२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ तो मंदिरात जाऊन शिकवत असताना मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ २४ येशू त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. जर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं, तर मीही तुम्हाला सांगीन की मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो. २५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’+ २६ आणि ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर लोक आपल्याला सोडणार नाहीत. कारण ते सगळे योहानला संदेष्टा मानतात.” २७ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.

  • लूक २०:१-८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० एक दिवशी तो मंदिरात शिकवत असताना आणि आनंदाचा संदेश सांगत असताना, मुख्य याजक आणि शास्त्री, वडीलजनांसोबत त्याच्याजवळ आले. २ ते त्याला म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ ३ तो त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या: ४ योहानने दिलेला बाप्तिस्मा देवापासून* होता की माणसांपासून?” ५ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले: “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ६ पण ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर सगळे लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची पक्की खातरी आहे.”+ ७ म्हणून, त्याचा बाप्तिस्मा कोणापासून होता हे आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. ८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा