वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २१:२३-२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ तो मंदिरात जाऊन शिकवत असताना मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ २४ येशू त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. जर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं, तर मीही तुम्हाला सांगीन की मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो. २५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’+ २६ आणि ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर लोक आपल्याला सोडणार नाहीत. कारण ते सगळे योहानला संदेष्टा मानतात.” २७ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.

  • मार्क ११:२७-३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ मग ते पुन्हा यरुशलेमला आले. तिथे तो मंदिरात फिरत होता, तेव्हा मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजन त्याच्याजवळ आले २८ आणि म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? या सगळ्या गोष्टी करायचा अधिकार कोणी दिला तुला?”+ २९ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या, मग मीही तुम्हाला सांगीन की कोणत्या अधिकाराने मी या गोष्टी करतो. ३० योहानने दिलेला बाप्तिस्मा+ देवापासून* होता की माणसांपासून? उत्तर द्या.”+ ३१ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण ‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ३२ आणि ‘माणसांपासून’ असं म्हणण्याचं धाडस तरी कसं करावं?” खरंतर, त्यांना लोकांची भीती होती. कारण योहान खरोखरच संदेष्टा होता, असं सगळे लोक मानायचे.+ ३३ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा