-
मत्तय ४:१-४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मग पवित्र शक्तीने* येशूला ओसाड रानात नेलं आणि तिथे सैतानाने*+ त्याची परीक्षा घेतली.+ २ त्याने ४० दिवस आणि ४० रात्री उपास केल्यावर त्याला भूक लागली. ३ तेव्हा परीक्षा घेणारा+ त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर या दगडांना भाकरी व्हायला सांग.” ४ पण त्याने उत्तर दिलं: “‘माणसाने फक्त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या* तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे,’ असं लिहिलंय.”+
-