-
मत्तय १२:१-८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ एकदा येशू शब्बाथाच्या* दिवशी शेतांतून चालला होता. त्याच्या शिष्यांना भूक लागल्यामुळे ते धान्याची कणसं तोडून खाऊ लागले.+ २ हे पाहून परूशी त्याला म्हणाले: “बघ, तुझे शिष्य शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट करत आहेत.”+ ३ तो त्यांना म्हणाला: “दावीद आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केलं ते तुम्ही वाचलं नाही का?+ ४ तो देवाच्या घरात गेला आणि त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या माणसांनी पवित्र भाकरी*+ खाल्ल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या भाकरी खाणं योग्य नव्हतं.+ ५ किंवा मग, शब्बाथाच्या दिवशी याजक मंदिरात काम करतात आणि तरीसुद्धा निर्दोष राहतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?+ ६ मी तर तुम्हाला सांगतो, जो मंदिरापेक्षा महान तो इथे आहे.+ ७ पण जर तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला असता, की ‘मला बलिदान नको, दया हवी,’+ तर जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही दोष लावला नसता. ८ कारण मनुष्याचा मुलगा शब्बाथाचा प्रभू आहे.”+
-
-
मार्क २:२३-२८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ मग शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य जाताजाता धान्याची कणसं तोडू लागले.+ २४ त्यामुळे परूशी त्याला म्हणाले: “बघ! शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट हे का करत आहेत?” २५ पण येशू त्यांना म्हणाला: “एकदा दावीदला आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नव्हतं तेव्हा त्याने काय केलं, हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ २६ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याने पवित्र भाकरी* खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं.+ तुम्ही याबद्दल मुख्य याजक अब्याथार+ याच्या वृत्तान्तात वाचलं नाही का?” २७ मग तो त्यांना म्हणाला: “माणूस शब्बाथासाठी नाही, तर शब्बाथ माणसासाठी अस्तित्वात आला.”+ २८ मनुष्याचा मुलगा तर शब्बाथाचाही प्रभू आहे.+
-