वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ८:२८, २९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ मग तो पलीकडे गदरेकरांच्या प्रदेशात आला. तेव्हा, दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेली दोन माणसं कबरस्तानातून येताना त्याला दिसली.+ ती माणसं इतकी भयंकर होती, की त्या रस्त्याने जाण्याचं कोणाचंही धाडस व्हायचं नाही. २९ अचानक ती माणसं किंचाळून म्हणाली: “देवाच्या मुला, तुझ्याशी आमचं काय घेणंदेणं?+ नेमलेल्या वेळेआधीच+ तू आम्हाला शिक्षा द्यायला* आलास का?”+

  • मार्क ५:२-१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ येशू नावेतून उतरताच, दुष्ट स्वर्गदूताच्या* प्रभावाखाली असलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याच्याकडे आला. ३ तो कबरस्तानातच राहायचा आणि त्याला बांधून ठेवणं कोणालाही शक्य नव्हतं; अगदी साखळीनेसुद्धा कोणी त्याला बांधून ठेवू शकत नव्हतं. ४ कितीतरी वेळा त्याला बेड्यांनी आणि साखळ्यांनी बांधण्यात आलं होतं, पण तो साखळ्या तोडून टाकायचा आणि बेड्यांचे तुकडेतुकडे करायचा; आणि कोणाकडेही त्याला आवरायची ताकद नव्हती. ५ तो रात्रंदिवस कबरस्तानात आणि डोंगरांमध्ये ओरडत राहायचा आणि स्वतःला दगडांनी मारून जखमी करायचा. ६ पण, दुरून येशूला पाहताच तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पाया पडला.+ ७ मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”+ ८ कारण येशू त्याला असं म्हणत होता: “अरे दुष्ट स्वर्गदूता, या माणसातून बाहेर निघ.”+ ९ मग येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तेव्हा तो म्हणाला: “माझं नाव ‘सैन्य’ आहे, कारण आम्ही बरेच जण आहोत.” १० तेव्हा तो येशूला विनंती करू लागला, की आम्हाला या प्रदेशातून घालवू नको.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा