-
लेवीय २३:५-८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी+ संध्याकाळी* यहोवासाठी वल्हांडण सण+ असेल.
६ या महिन्याच्या १५ व्या दिवशी यहोवासाठी बेखमीर* भाकरींचा सण+ असेल. सात दिवसांपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खा.+ ७ पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळावा ठेवा.+ तुम्ही कोणतंही मेहनतीचं काम करू नका. ८ सात दिवसांपर्यंत तुम्ही अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला द्या. सातव्या दिवशी एक पवित्र मेळावा असेल. त्या दिवशी कोणतंही मेहनतीचं काम करू नका.’”
-