वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २६:१४-१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले. १६ तेव्हापासून तो त्याला पकडून देण्याची एखादी चांगली संधी शोधू लागला.

  • मार्क १४:१०, ११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० मग १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण येशूला विश्‍वासघाताने पकडून द्यायला मुख्य याजकांकडे गेला.+ ११ हे ऐकून याजकांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी+ द्यायचं कबूल केलं. त्यामुळे तो त्याला पकडून द्यायची संधी शोधू लागला.

  • योहान ६:७०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७० येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हा बाराही जणांना निवडलं नव्हतं का?+ तरी तुमच्यापैकी एक जण निंदक* आहे.”+

  • योहान १३:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ मग संध्याकाळचं जेवण चाललं होतं. आणि सैतानाने* शिमोनचा मुलगा यहूदा इस्कर्योत याच्या मनात, येशूला विश्‍वासघाताने पकडून द्यायचं+ आधीच घातलं होतं.+

  • योहान १३:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ यहूदाने भाकरीचा तो तुकडा घेतल्यावर सैतानाने त्याच्या मनाचा ताबा घेतला.+ त्यामुळे येशू त्याला म्हणाला: “तू जे काही करत आहेस ते लवकर कर.”

  • प्रेषितांची कार्यं १:१६, १७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ “माणसांनो, भावांनो, येशूला अटक करणाऱ्‍यांना ज्याने त्याच्याकडे नेलं,+ त्या यहूदाबद्दल पवित्र शक्‍तीने दावीदच्या द्वारे जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण होणं गरजेचं होतं.+ १७ कारण तोही आपल्यातलाच एक होता+ आणि त्यालाही या सेवाकार्यासाठी निवडण्यात आलं होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा