वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गणना २१:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू एका विषारी सापाची प्रतिमा बनव आणि ती एका खांबावर लटकव. एखाद्याला साप चावला, तर त्याने जिवंत राहण्यासाठी त्याच्याकडे पाहावं.” ९ मोशेने लगेच एक तांब्याचा साप बनवला+ आणि तो एका खांबावर लटकवला.+ जेव्हा एखाद्या माणसाला साप चावायचा, तेव्हा तो त्या तांब्याच्या सापाकडे बघायचा आणि त्याचा जीव वाचायचा.+

  • दानीएल ७:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी पुढे पाहिलं, की मनुष्याच्या मुलासारखा कोणीतरी आकाशातल्या ढगांबरोबर येत होता.+ मग जो ‘अति प्राचीन’+ होता त्याच्यासमोर जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी त्याला त्याच्याजवळ नेलं.

  • मत्तय २६:६४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६४ येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच बोललात. पण मी तुम्हाला सांगतो: यापुढे तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+

  • योहान ३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ आणि ज्या प्रकारे मोशेने रानात सापाला उंचावर लटकवलं होतं,+ त्याच प्रकारे मनुष्याच्या मुलाला उंचावर लटकवलं जाईल.+

  • योहान १२:३२, ३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ पण मला पृथ्वीवरून उचललं जाईल*+ तेव्हा मी सगळ्या प्रकारच्या लोकांना माझ्याकडे आकर्षित करीन.” ३३ खरंतर, लवकरच त्याला कोणत्या प्रकारचं मरण येणार आहे,+ हे सुचवण्यासाठी तो असं बोलला.

  • गलतीकर ३:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ ख्रिस्ताने आपल्याला विकत घेतलं+ आणि आपल्याऐवजी स्वतः शापित होऊन त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्‍त केलं.+ कारण असं लिहिलं आहे: “वधस्तंभावर टांगलेला प्रत्येक माणूस शापित असो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा