१७ या गोष्टी बोलल्यानंतर, वर आकाशाकडे पाहून येशू म्हणाला: “बापा, वेळ आली आहे. मुलाने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या मुलाचा गौरव कर.+ २ जे तू त्याला दिले आहेत त्या सगळ्यांना+ त्याने सर्वकाळाचं जीवन द्यावं,+ म्हणून तू सर्व मानवांवर त्याला अधिकार दिलाय.+