११ मी यापुढे जगात नाही, कारण मी तुझ्याकडे येतोय, पण ते जगात आहेत.+ पवित्र बापा, तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांना सांभाळ.+ म्हणजे जसं आपण एक* आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं.*+
२४ तसंच, जो देवाच्या आज्ञांचं पालन करतो, तो देवासोबत ऐक्यात राहतो आणि देवही अशा माणसासोबत ऐक्यात राहतो.+ आणि त्याने आपल्याला दिलेल्या पवित्र शक्तीद्वारे आपल्याला हे कळतं, की तो आपल्यासोबत ऐक्यात आहे.+