-
प्रेषितांची कार्यं ९:३९, ४०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३९ तेव्हा पेत्र उठला आणि त्यांच्यासोबत गेला. तो तिथे पोहोचला, तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेलं. तिथे सगळ्या विधवा त्याच्याजवळ रडू लागल्या आणि दुर्कस त्यांच्यात असताना जे पुष्कळ कपडे आणि झगे* तिने त्यांच्यासाठी बनवले होते, ते त्याला दाखवू लागल्या. ४० तेव्हा पेत्रने सगळ्यांना बाहेर पाठवलं+ आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृतदेहाकडे वळून तो म्हणाला: “तबीथा, ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्रला पाहिल्यावर ती उठून बसली.+
-