१५ पण प्रभू त्याला म्हणाला: “जा! कारण हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.*+ तो विदेश्यांना,+ तसंच राजांना+ आणि इस्राएलच्या मुलांना माझ्या नावाची घोषणा करेल. १६ माझ्या नावासाठी त्याला कायकाय सोसावं लागेल हे मी त्याला स्पष्टपणे दाखवीन.”+
४ तिथे आम्ही शिष्यांचा शोध घेतला आणि ते भेटल्यावर सात दिवस तिथेच राहिलो. पण पवित्र शक्तीने* जे प्रकट केलं होतं, त्यामुळे शिष्य वारंवार पौलला असं सांगू लागले, की त्याने यरुशलेमला जाऊ नये.+
११ आमच्याकडे येऊन त्याने पौलच्या कमरेचा पट्टा घेतला आणि आपले हातपाय बांधून तो म्हणाला: “पवित्र शक्ती म्हणते: ‘हा पट्टा ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेमचे यहुदी अशाच प्रकारे बांधून+ विदेशी लोकांच्या हवाली करतील.’ ”+