११ त्याच्यासोबत तुमचं नातं असल्यामुळे, ख्रिस्ताच्या सेवकांची जशी सुंता* झाली पाहिजे+ तशी तुमची झाली आहे. ती हातांनी केलेली नसून, पापी शरीर काढून टाकण्याद्वारे केलेली सुंता आहे.+
५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्न करणाऱ्या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+