-
इफिसकर १:९-११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ हे त्याने त्याच्या इच्छेचं पवित्र रहस्य आपल्याला कळवण्याद्वारे केलं.+ त्याला चांगलं वाटलं त्याप्रमाणे त्याने स्वतः असं ठरवलं, १० की सगळ्या गोष्टी, म्हणजेच स्वर्गातल्या गोष्टी आणि पृथ्वीवर असलेल्या गोष्टी, ख्रिस्तामध्ये एकत्र करण्यासाठी ठरलेल्या काळांच्या समाप्तीला एक व्यवस्था करावी.*+ हो, त्याच ख्रिस्तामध्ये ११ ज्याच्यासोबत आम्ही ऐक्यात आहोत आणि ज्याच्यासोबत वारस होण्यासाठी आम्हाला नेमण्यात आलं होतं.+ देव, जो सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे ठरवून पूर्ण करतो, त्याने आपल्या उद्देशाप्रमाणे आम्हाला याकरता पूर्वीच नेमलं होतं.
-