वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १९:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ तू बदला घेऊ नकोस+ किंवा आपल्या भाऊबंदांबद्दल मनात राग बाळगू नकोस; आपल्या सोबत्यावर स्वतःसारखं प्रेम कर.+ मी यहोवा आहे.

  • मत्तय ७:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ म्हणून, ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.+ कारण नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत हेच सांगितलंय.+

  • मत्तय २२:३९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३९ तिच्यासारखीच दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’+

  • रोमकर १३:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ एकमेकांवर प्रेम करणं, याशिवाय कोणाचं काही कर्ज ठेवू नका.+ कारण जो दुसऱ्‍यावर प्रेम करतो त्याने नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन केलं आहे.+ ९ कारण, “व्यभिचार करू नका,+ खून करू नका,+ चोरी करू नका,+ लोभ धरू नका,”+ या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असेल, तर तिचा सारांश एकाच वचनात आहे. ते म्हणजे: “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम करा.”+

  • याकोब २:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर,”+ ही शास्त्रवचनांत दिलेली राजाज्ञा* तुम्ही पाळत असाल तर फार चांगली गोष्ट आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा