-
कलस्सैकर १:२५-२७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ देवाने माझ्यावर जो कारभार सोपवला आहे,+ त्याप्रमाणे मी तुमच्याकरता या मंडळीचा सेवक बनलो. हे यासाठी, की मी देवाच्या वचनाची पूर्णपणे घोषणा करावी. २६ हे पवित्र रहस्य+ पूर्वीच्या जगाच्या व्यवस्थांपासून*+ आणि पूर्वीच्या पिढ्यांपासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. पण आता ते देवाच्या पवित्र जनांना प्रकट करण्यात आलं आहे.+ २७ हे गौरवी आणि मौल्यवान पवित्र रहस्य विदेश्यांमध्ये घोषित करणं देवाला योग्य वाटलं.+ ते रहस्य म्हणजे, तुमच्यासोबत ऐक्यात असलेला ख्रिस्त, ज्याच्या गौरवात सहभागी होण्याची तुम्हाला आशा आहे.+
-