-
१ तीमथ्य १:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ मी मासेदोनियाला जायला निघालो होतो, तेव्हा मी तुला इफिसमध्ये राहायचं प्रोत्साहन दिलं होतं. आता मी तुला सांगतो, की तिथे असलेल्या काही जणांना, वेगळे सिद्धान्त न शिकवण्याची, ४ तसंच, काल्पनिक कथांकडे आणि वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची+ तू आज्ञा दे. कारण अशा गोष्टींमुळे उपयोगाचं असं काहीच साध्य होत नाही.+ आणि विश्वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, फक्त शंकाकुशंका उत्पन्न होतात.
-