२८ हे ऐकून आश्चर्य करू नका, कारण अशी वेळ येत आहे जेव्हा स्मारक कबरींमध्ये* असलेले सगळे त्याची हाक ऐकतील+२९ आणि बाहेर येतील. चांगली कामं करणाऱ्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल,* तर वाईट कामं करणाऱ्यांचा न्याय केला जाईल.*+
४२ तसंच, त्याने आम्हाला लोकांकडे जाऊन असा प्रचार करायचा आणि पूर्ण साक्ष द्यायचा आदेश दिला,+ की ज्याला देवाने जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करायला नियुक्त केलं तो हाच आहे.+