वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १५:७, ८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला देत आहे त्यातल्या एखाद्या शहरात, तुमच्या भावांपैकी कोणाला गरिबी आली, तर तुमच्या गरीब भावाबद्दल आपलं मन कठोर करू नका किंवा त्याला काही देताना कंजूसपणा करू नका.+ ८ याउलट, तुम्ही त्याला उदार हाताने द्या+ आणि त्याला ज्या गोष्टींची गरज असेल किंवा त्याच्याकडे ज्या काही गोष्टींची कमी असेल, त्या त्याला उसन्या द्या.*

  • मत्तय २५:३५, ३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ कारण मी उपाशी होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं. मला तहान लागली होती, तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं. मी अनोळखी होतो तरी तुम्ही मला आपल्या घरात घेतलं.+ ३६ मी उघडा होतो* तेव्हा तुम्ही मला कपडे दिले.+ मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’+

  • लूक ३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तो त्यांना म्हणायचा: “ज्याच्याजवळ दोन झगे आहेत* त्याने त्यातला एक, अशा माणसाला द्यावा ज्याच्याजवळ एकही नाही. आणि ज्याच्याजवळ खायला काही आहे त्यानेही असंच करावं.”+

  • रोमकर १२:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ पवित्र जनांच्या गरजा भागवायला हातभार लावा.+ पाहुणचार करत राहा.+

  • १ तीमथ्य ५:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ पण जर एखाद्या विधवेला मुलं किंवा नातवंडं असतील, तर त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण देवाची भक्‍ती करतो हे दाखवावं.+ त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आणि आजीआजोबांच्या उपकारांची परतफेड करायला शिकावं,+ कारण देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे.+

  • याकोब १:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना हीच आहे, की आपण अनाथ+ आणि विधवा+ यांच्या कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी+ आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावं.+

  • १ योहान ३:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जगात धनसंपत्ती असलेल्या एखाद्याने जर आपल्या बांधवाला अडचणीत पाहूनही त्याला दया दाखवली नाही, तर मग त्याचं देवावर प्रेम आहे असं कसं म्हणता येईल?+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा