१० आणि इस्राएलच्या लोकांची* संख्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी होईल; तिचं मोजमाप करता येणार नाही.+ आणि ‘तुम्ही माझे लोक नाही,’+ असं जिथे त्यांना म्हणण्यात आलं होतं, तिथे ‘तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात,’ असं त्यांना म्हणण्यात येईल.+
१४ देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी+ पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल शिमोनने*+ अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय.
२५ होशेयच्या पुस्तकात त्याने म्हटलं त्याप्रमाणेच हे आहे: “जे माझे लोक नव्हते,+ त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणीन. आणि जी प्रिय नव्हती, तिला ‘प्रिय’ म्हणीन.+