वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • हाग्गय १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

हाग्गय रूपरेषा

      • मंदिर न बांधल्यामुळे ताडन (१-११)

        • “सुंदर घरांमध्ये राहण्याची ही वेळ आहे का?” (४)

        • “आपल्या वागण्याकडे लक्ष द्या” (५)

        • भरपूर पेरणी पण फार थोडं पीक (६)

      • लोक यहोवाचं ऐकतात (१२-१५)

हाग्गय १:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, सणाच्या दिवशी जन्मलेला.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +एज ३:२; ५:२
  • +एज ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ३०

हाग्गय १:२

तळटीपा

  • *

    किंवा “पुन्हा बांधण्याची.”

समासातील संदर्भ

  • +एज ४:४, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. ३

    ५/१/२००६, पृ. ९-१०

    १/१/१९९७, पृ. ८

हाग्गय १:३

समासातील संदर्भ

  • +एज ६:१४

हाग्गय १:४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५२:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. ९-१०

हाग्गय १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १०, १४

हाग्गय १:६

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १०

    ६/१/१९८९, पृ. २९

हाग्गय १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००१, पृ. ११

हाग्गय १:८

समासातील संदर्भ

  • +एज ३:७
  • +एज ५:२; ६:१५; जख १:१६
  • +यश ६०:१३

हाग्गय १:९

समासातील संदर्भ

  • +मला २:२
  • +हाग १:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १४-१५

हाग्गय १:१२

समासातील संदर्भ

  • +१इत ३:१७-१९; लूक ३:२३, २७
  • +मत्त १:१२
  • +१इत ६:१५

हाग्गय १:१३

समासातील संदर्भ

  • +२इत १५:२; यश ८:१०; रोम ८:३१

हाग्गय १:१४

समासातील संदर्भ

  • +एज १:८; ५:१४
  • +जख ३:१; ६:११-१३
  • +एज १:१, ५
  • +एज ५:२; जख ६:१५

हाग्गय १:१५

समासातील संदर्भ

  • +एज ४:२४; हाग १:१; जख १:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

हाग्ग. १:१एज ३:२; ५:२
हाग्ग. १:१एज ५:१
हाग्ग. १:२एज ४:४, २३
हाग्ग. १:३एज ६:१४
हाग्ग. १:४यिर्म ५२:१२, १३
हाग्ग. १:६अनु २८:२२
हाग्ग. १:८एज ३:७
हाग्ग. १:८एज ५:२; ६:१५; जख १:१६
हाग्ग. १:८यश ६०:१३
हाग्ग. १:९हाग १:४
हाग्ग. १:९मला २:२
हाग्ग. १:१२१इत ३:१७-१९; लूक ३:२३, २७
हाग्ग. १:१२मत्त १:१२
हाग्ग. १:१२१इत ६:१५
हाग्ग. १:१३२इत १५:२; यश ८:१०; रोम ८:३१
हाग्ग. १:१४एज १:८; ५:१४
हाग्ग. १:१४जख ३:१; ६:११-१३
हाग्ग. १:१४एज १:१, ५
हाग्ग. १:१४एज ५:२; जख ६:१५
हाग्ग. १:१५एज ४:२४; हाग १:१; जख १:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हाग्गय १:१-१५

हाग्गय

१ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, यहूदाचा राज्यपाल, म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा, म्हणजे महायाजक यहोशवा यांना संदेष्टा हाग्गय*+ याच्याकडून यहोवाचा* हा संदेश मिळाला:

२ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“यहोवाचं मंदिर बांधण्याची* वेळ अजून आली नाही,”+ असं हे लोक म्हणतात.’”

३ मग हाग्गय+ संदेष्ट्याला पुन्हा यहोवाकडून हा संदेश मिळाला: ४ “तुम्ही आपापल्या सुंदर घरांमध्ये राहण्याची ही वेळ आहे का? पाहा, तिथे माझं मंदिर ओसाड पडलं आहे.+ ५ म्हणून सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या. ६ तुम्ही भरपूर पेरणी करता, पण तुम्हाला फार थोडं पीक मिळतं.+ तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. आणि मजुरी करणारा आपली मजुरी, भोकं पडलेल्या बटव्यात टाकतो.’”

७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘आपल्या वागण्याकडे लक्ष द्या.’

८ यहोवा म्हणतो, ‘उठा, डोंगरावर जाऊन लाकडं आणा+ आणि माझं मंदिर बांधा,+ म्हणजे त्यामुळे मी संतुष्ट होईन आणि माझा गौरव होईल.’”+

९ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘तुम्ही भरपूर पिकाची अपेक्षा करायचा, पण तुम्हाला फार थोडं मिळायचं, आणि जेव्हा तुम्ही ते घरी आणायचा, तेव्हा मी ते उडवून लावायचो.+ कशामुळे? कारण इकडे माझं मंदिर ओसाड पडलं आहे, आणि तुम्ही मात्र आपापल्या घरासाठी धावपळ करत आहात.+ १० म्हणून आकाशाने दव आणि पृथ्वीने पीक देणं बंद केलं. ११ मी तुमची जमीन आणि डोंगर कोरडे पाडले. त्यामुळे अन्‍नधान्य, द्राक्षारस, तेल आणि जमिनीच्या उत्पन्‍नाचा दुष्काळ पडला. तुमच्यासोबतच तुमच्या गुराढोरांचेही हाल होत आहेत आणि तुमची सगळी मेहनत वाया जात आहे.’”

१२ तेव्हा, शल्तीएलचा+ मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा+ मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा, तसंच बाकीचे सर्व लोक, यांनी आपला देव यहोवा याचं ऐकलं आणि संदेष्टा हाग्गय याने दिलेल्या संदेशाकडे लक्ष दिलं. कारण त्यांचा देव यहोवा यानेच हाग्गयला पाठवलं होतं. आणि लोक यहोवाचं भय मानू लागले.

१३ मग यहोवाचा संदेष्टा हाग्गय याने यहोवाकडून मिळालेल्या आज्ञेप्रमाणे, लोकांना हा संदेश दिला: “यहोवा म्हणतो, ‘मी तुमच्यासोबत आहे.’”+

१४ मग यहोवाने यहूदाचा राज्यपाल+ म्हणजे शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि यहोसादाकचा मुलगा म्हणजे महायाजक यहोशवा,+ तसंच बाकीचे सर्व लोक यांच्या मनाला प्रेरणा दिली.+ तेव्हा त्या सर्वांनी येऊन आपला देव, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली.+ १५ दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी,+ सहाव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी हे घडलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा