स्तोत्र
संकटांनी आणि दुःखांनी मला घेरलं.+
४ पण मी यहोवाच्या नावाने हाक मारून म्हणालो:+
“हे यहोवा, मला* वाचव!”
६ यहोवा अनुभव नसलेल्यांचं रक्षण करतो.+
मी अगदी खचून गेलो होतो, पण त्याने मला वाचवलं.
७ माझा जीव* पुन्हा निश्चिंत होईल,
कारण यहोवाने माझ्यावर दया केली आहे.
८ तू मृत्यूपासून माझं रक्षण केलंस,
माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसलेस
आणि माझ्या पायांना अडखळण्यापासून वाचवलंस.+
९ मी जिवंतांच्या देशात यहोवापुढे चालत राहीन.
१० मला विश्वास होता, म्हणून मी बोललो;+
पण खरंतर मी खूप दुःखी होतो.
११ मी तर घाबरून गेलो आणि म्हणालो:
“प्रत्येक माणूस खोटा आहे.”+
१२ यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत,
त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ?
१३ मी तारणाचा* प्याला हाती घेईन,
मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन.
१६ हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो,
कारण मी तुझा सेवक आहे.
मी तुझा सेवक, तुझ्या दासीचा मुलगा आहे.
तू मला माझ्या बंधनांतून मोकळं केलं आहेस.+
१७ मी तुला उपकारस्तुतीचं बलिदान देईन.+
मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन.
१९ यहोवाच्या घराच्या अंगणांत,+
यरुशलेममध्ये मी ते फेडीन.