स्तोत्र
तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि विश्वासूपणामुळे तुझ्या नावाचा गौरव कर.+
२ “त्यांचा देव कुठे आहे,”
असं इतर राष्ट्रांनी का म्हणावं?+
३ आमचा देव स्वर्गात आहे;
त्याला आवडतं ते तो करतो.
४ त्यांच्या मूर्ती तर सोन्याचांदीच्या आहेत;
त्या माणसांच्या हातांनी घडवलेल्या आहेत.+
५ त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;+
डोळे आहेत, पण पाहता येत नाही.
६ त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही;
नाक आहे, पण वास घेता येत नाही.
७ त्यांना हात आहेत, पण स्पर्श करता येत नाही;
पाय आहेत, पण चालता येत नाही;+
त्यांच्या गळ्यातून आवाज फुटत नाही.+
८ त्यांना घडवणारे त्यांच्यासारखेच होतील,+
त्यांच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांचीही, त्यांच्यासारखीच स्थिती होईल.+
९ हे इस्राएल, यहोवावर भरवसा ठेव.+
तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+
१० हे अहरोनच्या घराण्या,+ यहोवावर भरवसा ठेव.
तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.
११ यहोवाची भीती बाळगणाऱ्या लोकांनो, यहोवावर भरवसा ठेवा.+
तो तुम्हाला मदत करेल, तो तुमची ढाल आहे.+
१२ यहोवा आपली आठवण ठेवतो;
तो आपल्याला आशीर्वाद देईल.
तो इस्राएलच्या घराण्याला;+
अहरोनच्या घराण्याला आशीर्वाद देईल.
१३ यहोवाची भीती बाळगणाऱ्या लोकांना;
लहानमोठ्यांना तो आशीर्वाद देईल.
१८ पण आम्ही याहची स्तुती करू;
आतापासून सर्वकाळापर्यंत, आम्ही त्याचं गुणगान करू.
याहची स्तुती करा!*