वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

दानीएल रूपरेषा

      • यहोवाच राजा असल्याचं नबुखद्‌नेस्सर राजा मान्य करतो (१-३)

      • राजा एका वृक्षाचं स्वप्न पाहतो (४-१८)

        • कापलेल्या वृक्षावरून सात काळ जातील (१६)

        • देवच सर्व मानवांचा राजा आहे (१७)

      • दानीएल स्वप्नाचा अर्थ सांगतो (१९-२७)

      • स्वप्नाची पहिली पूर्णता राजावर (२८-३६)

        • राजा सात काळांसाठी वेडा होतो (३२, ३३)

      • राजा स्वर्गाच्या देवाचा गौरव करतो (३७)

दानीएल ४:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:१६; ९०:२; यिर्म १०:१०

दानीएल ४:५

समासातील संदर्भ

  • +दान २:१

दानीएल ४:६

समासातील संदर्भ

  • +दान २:२

दानीएल ४:७

तळटीपा

  • *

    म्हणजे, शकुनविद्या आणि फलज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ४७:१३
  • +दान २:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१६

दानीएल ४:८

समासातील संदर्भ

  • +यश ४६:१; यिर्म ५०:२
  • +दान १:७
  • +दान ४:१८; ५:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १४

दानीएल ४:९

समासातील संदर्भ

  • +दान १:२०; २:४८
  • +उत्प ४१:३८; दान ६:३
  • +दान १:१७, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १९

दानीएल ४:१०

समासातील संदर्भ

  • +दान ४:२६
  • +दान ४:२०-२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९७, पृ. ४-५

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३८

दानीएल ४:१३

समासातील संदर्भ

  • +दान ४:२३-२६

दानीएल ४:१४

समासातील संदर्भ

  • +दान ४:३१; ५:१८, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३८-१४०

दानीएल ४:१५

समासातील संदर्भ

  • +दान ४:३२, ३३

दानीएल ४:१६

समासातील संदर्भ

  • +लूक २१:२४
  • +दान ४:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४०-१४१

दानीएल ४:१७

समासातील संदर्भ

  • +दान ४:१३
  • +दान ४:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१५, पृ. ९

    ११/१/२००५, पृ. १८

दानीएल ४:१८

समासातील संदर्भ

  • +यश ४७:१३; दान २:२७; ५:८, १५

दानीएल ४:१९

समासातील संदर्भ

  • +दान १:७

दानीएल ४:२०

समासातील संदर्भ

  • +दान ४:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १९

दानीएल ४:२१

समासातील संदर्भ

  • +दान ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:२२

समासातील संदर्भ

  • +यश १४:१३, १४
  • +दान २:३७, ३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:२३

समासातील संदर्भ

  • +दान ४:१३; ८:१३
  • +दान ४:१३-१६; लूक २१:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    ज्ञान, पृ. ९६-९७

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १४०-१४१

दानीएल ४:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:२५

समासातील संदर्भ

  • +दान ४:३१-३३
  • +लूक २१:२४; प्रक १२:६, १४
  • +दान ४:१६
  • +१शमु २:७, ८; ईयो ३४:२४; यिर्म २७:५; यहे २१:२६, २७; दान २:२१; ७:१३, १४; लूक १:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:२६

तळटीपा

  • *

    शब्दशः “शासन करणारा स्वर्ग आहे.”

समासातील संदर्भ

  • +दान ४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:२७

समासातील संदर्भ

  • +१रा २१:२९; योए २:१४; योन ३:८-१०

दानीएल ४:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. १८

    ९/१/१९८९, पृ. २७

दानीएल ४:३१

समासातील संदर्भ

  • +दान ४:२५; प्रेका १२:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:३२

समासातील संदर्भ

  • +दान ४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:३३

समासातील संदर्भ

  • +दान ४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:३४

समासातील संदर्भ

  • +दान ४:१६
  • +स्तो १०:१६; दान ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:३५

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचा हात धरू शकत नाही.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३४:२४; यश ४३:१३
  • +यश ४५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. १८

दानीएल ४:३६

समासातील संदर्भ

  • +दान ४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

दानीएल ४:३७

समासातील संदर्भ

  • +दान ४:२, ३
  • +अनु ३२:४; स्तो ३३:५
  • +निर्ग १८:१०, ११; याक ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. १८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

दानी. ४:३स्तो १०:१६; ९०:२; यिर्म १०:१०
दानी. ४:५दान २:१
दानी. ४:६दान २:२
दानी. ४:७यश ४७:१३
दानी. ४:७दान २:१०, ११
दानी. ४:८यश ४६:१; यिर्म ५०:२
दानी. ४:८दान १:७
दानी. ४:८दान ४:१८; ५:११, १२
दानी. ४:९दान १:२०; २:४८
दानी. ४:९उत्प ४१:३८; दान ६:३
दानी. ४:९दान १:१७, २०
दानी. ४:१०दान ४:२६
दानी. ४:१०दान ४:२०-२२
दानी. ४:१३दान ४:२३-२६
दानी. ४:१४दान ४:३१; ५:१८, २०
दानी. ४:१५दान ४:३२, ३३
दानी. ४:१६लूक २१:२४
दानी. ४:१६दान ४:३२
दानी. ४:१७दान ४:१३
दानी. ४:१७दान ४:३४
दानी. ४:१८यश ४७:१३; दान २:२७; ५:८, १५
दानी. ४:१९दान १:७
दानी. ४:२०दान ४:१०, ११
दानी. ४:२१दान ४:१२
दानी. ४:२२यश १४:१३, १४
दानी. ४:२२दान २:३७, ३८
दानी. ४:२३दान ४:१३; ८:१३
दानी. ४:२३दान ४:१३-१६; लूक २१:२४
दानी. ४:२५दान ४:३१-३३
दानी. ४:२५लूक २१:२४; प्रक १२:६, १४
दानी. ४:२५दान ४:१६
दानी. ४:२५१शमु २:७, ८; ईयो ३४:२४; यिर्म २७:५; यहे २१:२६, २७; दान २:२१; ७:१३, १४; लूक १:३२, ३३
दानी. ४:२६दान ४:१५
दानी. ४:२७१रा २१:२९; योए २:१४; योन ३:८-१०
दानी. ४:३१दान ४:२५; प्रेका १२:२२, २३
दानी. ४:३२दान ४:१७
दानी. ४:३३दान ४:२५
दानी. ४:३४दान ४:१६
दानी. ४:३४स्तो १०:१६; दान ४:३
दानी. ४:३५ईयो ३४:२४; यश ४३:१३
दानी. ४:३५यश ४५:९
दानी. ४:३६दान ४:२६
दानी. ४:३७दान ४:२, ३
दानी. ४:३७अनु ३२:४; स्तो ३३:५
दानी. ४:३७निर्ग १८:१०, ११; याक ४:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
दानीएल ४:१-३७

दानीएल

४ “नबुखद्‌नेस्सर राजाकडून संपूर्ण पृथ्वीवर असलेल्या सर्व राष्ट्रांना आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांना असा संदेश आहे: तुमची शांती अधिकाधिक वाढो! २ सर्वोच्च देवाने माझ्या बाबतीत केलेली चिन्हं आणि अद्‌भुत कार्यं यांविषयी तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे. ३ त्याची चिन्हं किती महान आहेत! आणि त्याची अद्‌भुत कार्यं किती शक्‍तिशाली आहेत! त्याचं राज्य सदासर्वकाळाचं, आणि त्याचं शासन पिढ्या न्‌ पिढ्या राहणारं आहे.+

४ मी, नबुखद्‌नेस्सर, आपल्या घरात शांतीने राहत होतो आणि आपल्या राजमहालात सुखसमृद्धीचं जीवन जगत होतो. ५ त्या वेळी मी एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामुळे मला फार भीती वाटली. मी माझ्या बिछान्यावर पडलो होतो, तेव्हा मला अशी दृश्‍यं आणि दृष्टान्त दिसले ज्यांमुळे मी खूप घाबरून गेलो.+ ६ माझ्या या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी मी बाबेलच्या सगळ्या ज्ञानी माणसांना माझ्यासमोर बोलावून आणण्याचा हुकूम दिला.+

७ तेव्हा मंत्रतंत्र करणारे पुजारी, जादूगार, खास्दी माणसं* आणि ज्योतिषी*+ हे सर्व माझ्यासमोर हजर झाले. मी त्यांना माझं स्वप्न सांगितलं, पण ते त्याचा अर्थ मला सांगू शकले नाहीत.+ ८ शेवटी, ज्याला माझ्या देवाच्या नावावरून+ बेल्टशस्सर असं नाव देण्यात आलं होतं, तो दानीएल माझ्यासमोर आला.+ त्याच्यामध्ये पवित्र देवांची शक्‍ती होती.+ त्याला मी माझं स्वप्न सांगितलं; मी म्हणालो:

९ ‘हे बेल्टशस्सर! मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांच्या प्रमुखा!+ मला माहीत आहे, की तुझ्यामध्ये पवित्र देवांची शक्‍ती आहे+ आणि कोणतंही रहस्य उलगडून सांगणं तुझ्यासाठी कठीण नाही.+ म्हणून आता, मी स्वप्नात जे दृष्टान्त पाहिले त्यांचा अर्थ मला समजावून सांग.

१० मी माझ्या बिछान्यावर झोपलो होतो, तेव्हा मला काही दृष्टान्त दिसले. मला पृथ्वीच्या मधोमध एक वृक्ष दिसला.+ तो अतिशय उंच होता.+ ११ तो वृक्ष वाढत जाऊन खूप मजबूत झाला. त्याची उंची इतकी वाढली, की तो आकाशापर्यंत पोहोचला. आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतून तो दिसायचा. १२ त्याची पानं खूप सुंदर होती. त्याला भरपूर फळं लागली होती आणि सर्वांना पुरेल इतकं अन्‍न त्यापासून मिळायचं. रानातली जनावरं त्याच्या सावलीत आश्रय घ्यायची आणि आकाशातले पक्षी त्याच्या फांद्यांवर राहायचे. सगळ्या प्राण्यांचं त्या वृक्षामुळे पोषण व्हायचं.

१३ मी बिछान्यावर पडलेलो असताना मला जो दृष्टान्त दिसला त्यात पुढे मी पाहिलं, की एक पहारेकरी, एक पवित्र दूत स्वर्गातून खाली येत होता.+ १४ तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हा वृक्ष कापून टाका.+ त्याच्या फांद्या तोडा आणि तो हलवून त्याची पानं पाडा. त्याची फळं इथे-तिथे विखरून टाका! त्याच्याखाली आश्रय घेणारी जनावरं पळून जावोत आणि पक्षी त्याच्या फांद्यांवरून उडून जावोत. १५ पण वृक्षाचा बुंधा मात्र त्याच्या मुळांसकट जमिनीत राहू द्या. त्याला लोखंड व तांब्याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या गवतात तसंच राहू द्या. तो आकाशातून पडणाऱ्‍या दवामुळे भिजत राहो, आणि पृथ्वीवरच्या झाडाझुडपांत जनावरांसोबत राहो.+ १६ त्याचं मानवी हृदय बदलून जावो, व त्याला जनावराचं हृदय देण्यात येवो. आणि त्यावरून सात काळ+ जावोत.+ १७ पहारेकऱ्‍यांनी+ जाहीर केलेला आदेश आणि पवित्र दूतांनी घोषित केलेला निर्णय हाच आहे. यावरून पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांना समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे.+ तसंच, आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो आणि अगदी क्षुल्लक व साधारण माणसालाही त्यावर शासन करायला नेमतो.”

१८ मी, राजा नबुखद्‌नेस्सर, याने पाहिलेलं स्वप्न हेच आहे. आता हे बेल्टशस्सर! या स्वप्नाचा अर्थ मला सांग. कारण माझ्या साम्राज्यातल्या कोणत्याही ज्ञानी माणसाला त्याचा अर्थ समजावून सांगता येत नाही.+ पण तुला तो समजावून सांगता येईल, कारण तुझ्यामध्ये पवित्र देवांची शक्‍ती आहे.’

१९ तेव्हा बेल्टशस्सर म्हटलेला दानीएल+ क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याच्या मनात आलेल्या विचारांमुळे तो घाबरून गेला.

त्यावर राजा त्याला म्हणाला: ‘हे बेल्टशस्सर! या स्वप्नामुळे आणि त्याच्या अर्थामुळे घाबरू नकोस.’

तेव्हा बेल्टशस्सरने उत्तर दिलं: ‘माझ्या प्रभू! हे स्वप्न, तुमचा द्वेष करणाऱ्‍यांना आणि त्याचा अर्थ तुमच्या शत्रूंना लागू होवो.

२० तुम्ही जो वृक्ष पाहिलात, जो वाढत जाऊन मजबूत झाला, ज्याची उंची आकाशापर्यंत पोहोचली आणि जो संपूर्ण पृथ्वीवरून दिसत होता,+ २१ ज्याची पानं सुंदर होती, ज्याला भरपूर फळं होती आणि ज्यापासून सर्वांना अन्‍न मिळायचं, ज्याच्याखाली रानातली जनावरं आश्रय घ्यायची आणि ज्याच्या फांद्यांवर आकाशातले पक्षी राहायचे,+ २२ तो वृक्ष तुम्हीच आहात. कारण हे राजा! तुम्ही खूप महान आणि शक्‍तिशाली बनला आहात. तुमचं वैभव वाढून आकाशापर्यंत पोहोचलंय+ आणि तुमचं शासन पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत पसरलंय.+

२३ मग राजाने एका पहारेकऱ्‍याला, एका पवित्र दूताला+ स्वर्गातून खाली येताना पाहिलं. तो म्हणत होता: “हा वृक्ष कापून टाका आणि त्याचा नाश करा. पण त्याचा बुंधा मात्र त्याच्या मुळांसकट जमिनीत राहू द्या. त्याला लोखंड व तांब्याच्या पट्ट्याने बांधून रानातल्या गवतात राहू द्या. त्याला आकाशातल्या दवामुळे भिजू द्या, आणि त्यावरून सात काळ जाईपर्यंत त्याला रानातल्या जनावरांसोबत राहू द्या.”+ २४ हे राजा! याचा अर्थ असा आहे; सर्वोच्च देवाने माझ्या प्रभूच्या, राजाच्या बाबतीत असा आदेश दिलाय, की २५ तुम्हाला माणसांमधून घालवून दिलं जाईल आणि तुम्ही रानातल्या जनावरांसोबत राहाल. तुम्ही बैलांप्रमाणे गवत खाल आणि आकाशातल्या दवामुळे भिजाल,+ आणि तुमच्यावरून सात काळ+ जातील.+ तेव्हा तुम्हाला समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.+

२६ पण ते म्हणाले, की वृक्षाचा बुंधा त्याच्या मुळांसकट तसाच राहू द्या.+ याचा अर्थ असा, की स्वर्गात शासन करणारा कोणीतरी आहे,* याची तुम्हाला जाणीव झाल्यावर तुमचं राज्य तुम्हाला परत मिळेल. २७ म्हणून हे राजा! कृपया माझा सल्ला मान्य करा. पाप करण्याचं सोडून द्या आणि चांगली कामं करा; आपला दुष्टपणा सोडून द्या आणि गरिबांना दया दाखवा. म्हणजे कदाचित तुमच्या सुखसमृद्धीचे दिवस आणखी वाढवले जातील.’”+

२८ हे सगळं नबुखद्‌नेस्सर राजाच्या बाबतीत घडलं.

२९ मग १२ महिन्यांनंतर, राजा एकदा बाबेलमधल्या आपल्या राजमहालाच्या छतावर फिरत होता, ३० तेव्हा तो म्हणाला: “पाहा, हे महान बाबेल शहर! मी ते माझ्या शाही निवासासाठी आणि माझ्या ऐश्‍वर्याच्या गौरवासाठी स्वतःच्या शक्‍तीने आणि सामर्थ्याने बांधलंय!”

३१ राजाच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच आकाशातून असा आवाज ऐकू आला: “हे राजा नबुखद्‌नेस्सर! तुला असं सांगण्यात येत आहे, की ‘तुझं राज्य तुझ्या हातून काढून घेण्यात आलंय.+ ३२ तुला माणसांमधून घालवून दिलं जाईल. तू रानातल्या जनावरांमध्ये राहशील व बैलांप्रमाणे गवत खाशील, आणि तुझ्यावरून सात काळ जातील. तेव्हा तुला समजेल, की सर्वोच्च देव हाच मानवी राज्यांवर शासनकर्ता आहे आणि आपली इच्छा असेल त्याला तो राज्य देतो.’”+

३३ आणि त्याच क्षणी हे शब्द नबुखद्‌नेस्सरच्या बाबतीत पूर्ण झाले. त्याला माणसांमधून घालवून देण्यात आलं. तो बैलांप्रमाणे गवत खाऊ लागला आणि त्याचं शरीर आकाशातल्या दवाने भिजू लागलं. त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढले आणि त्याची नखं पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.+

३४ “तो काळ संपल्यावर+ मी, नबुखद्‌नेस्सर, याने वर आकाशाकडे पाहिलं, आणि माझी बुद्धी मला परत मिळाली. तेव्हा मी सर्वोच्च देवाची स्तुती केली; सदासर्वकाळ जिवंत असणाऱ्‍या देवाचा मी गौरव व धन्यवाद केला. कारण त्याचं शासन सर्वकाळाचं, आणि त्याचं राज्य पिढ्या न्‌ पिढ्या राहणारं आहे.+ ३५ पृथ्वीवर राहणारे त्याच्यासमोर काहीच नाहीत. स्वर्गातल्या सैन्याच्या बाबतीत आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांच्या बाबतीत तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो. कोणीही त्याला अडवू शकत नाही,*+ किंवा ‘तू हे काय केलंस?’ असं कोणीही त्याला विचारू शकत नाही.+

३६ त्या वेळी माझी बुद्धी मला परत मिळाली. माझं राजवैभव, माझा महिमा आणि माझं ऐश्‍वर्य मला पुन्हा मिळालं.+ मोठमोठे अधिकारी व प्रतिष्ठित लोक माझ्याशी बोलायला उत्सुक झाले. माझं राज्यपद मला परत मिळालं आणि आधीपेक्षा जास्त मानसन्मान मला मिळाला.

३७ आता मी, नबुखद्‌नेस्सर, स्वर्गांच्या राजाची स्तुती करतो; त्याचा सन्मान आणि गौरव करतो.+ कारण त्याची सगळी कार्यं सत्य आहेत, त्याचे मार्ग न्यायाचे आहेत+ आणि जे गर्विष्ठपणे वागतात, त्यांना तो नमवू शकतो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा