वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सशस्त्र लुटारू हल्ला करतात तेव्हा
    टेहळणी बुरूज—१९९८ | डिसेंबर १५
    • सशस्त्र लुटारू येतात तेव्हा

      पण तुमच्या घरात प्रवेश करून लुटारू साक्षात तुमच्यासमोर असल्यास तुम्ही काय करावे? तुमच्या जिवापेक्षा तुमच्याकडील धनसंपत्ती मोलाची नाही हे लक्षात ठेवा. येशू ख्रिस्ताने म्हटले: “दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो . . . तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाहि घेऊ दे.”—मत्तय ५:३९, ४०.

      हा सुज्ञ सल्ला आहे. गुन्हेगारांना आपल्या मालमत्तेविषयी माहिती देण्यास ख्रिस्ती बांधील नाहीत हे खरे असले तरी, लुटारूंना जेव्हा कळते, की त्यांना विरोध केला जात आहे, त्यांना सहकार्य दाखवले जात नाही किंवा फसवले जात आहे तेव्हा मात्र ते हाणामारीवर येण्याची शक्यता असते. या लुटारूंपैकी बहुतेक जण “कोडगे झाल्यामुळे” ते लगेच उग्र आणि निर्दयी रूप धारण करतात.—इफिसकर ४:१९.

      सॅम्युएल एका इमारतीत राहतो. लुटारूंनी त्याच्या इमारतीचे प्रवेशद्वारच बंद केले आणि ते एकानंतर एक असे करत इमारती लुटू लागले. गोळीबाराचा आवाज, दरवाजांची आदळआपट तसेच लोकांचे ओरडणे, रडणे आणि आक्रोश सॅम्युएलच्या कानावर आला. पळ काढणे शक्यच नव्हते. सॅम्युएलने त्याच्या पत्नीला आणि तीन मुलांना गुडघे टेकून हात वर करण्यास आणि डोळे बंद करून वाट पाहण्यास सांगितले. जेव्हा लुटारू आदळआपट करत सॅम्युएलच्या घरात आले तेव्हा तो त्यांच्याशी मान खाली घालून बोलला कारण त्याने त्यांचा चेहरा पाहिल्यास आपण त्यांना नंतर ओळखू असा कदाचित ते विचार करतील हे त्याला माहीत होते. तो त्यांना म्हणाला: “आत या, तुम्हाला जे काही हवं ते घ्या. तुम्ही काहीही घेऊ शकता. आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि तुम्हाला कोणताही विरोध आमच्याकडून होणार नाही.” हे ऐकून लुटारू आवाक झाले. त्या तासाभराच्या काळात एकूण १२ शस्त्रधारी लोक गटागटाने येऊन गेले. त्यांनी सॅम्युएलच्या घरातील दागदागिने, पैसे आणि इलेक्ट्रॉनिक सामान नेले, पण इमारतीतल्या इतर लोकांप्रमाणे त्याच्या कुटुंबाला त्यांनी मारहाण केली नाही किंवा त्यांच्यावर चाकूसुऱ्‍यांनी वार केले नाहीत. जीव वाचवल्याबद्दल सॅम्युएलच्या कुटुंबाने यहोवाचे आभार मानले.

      या उदाहरणावरून स्पष्ट होते, की पैशाची किंवा भौतिक गोष्टींची बाब येते तेव्हा लुटारूंना विरोध न केल्यामुळे धोका पोहंचण्याची शक्यता कमी असते.a

  • सशस्त्र लुटारू हल्ला करतात तेव्हा
    टेहळणी बुरूज—१९९८ | डिसेंबर १५
    • a अर्थात, लुटारूंना सहकार्य करण्याचीही सीमा आहे. देवाच्या नियमाचा भंग होईल असे कोणतेही काम करण्यास यहोवाचे साक्षीदार सहकार्य करत नाहीत. उदारणार्थ, एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती त्यासाठी स्वेच्छेने तयार होणार नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा