-
“मी कैसराजवळ न्याय मागतो!”टेहळणी बुरूज—२००१ | डिसेंबर १५
-
-
प्रमुख याजक हनन्या, यहूद्यांचे काही वडील आणि तिर्तुल्ल यांनी, पौल ‘हा एक पीडा असून सर्व यहूदी लोकांत बंड उठवणारा आहे’ असा त्याच्यावर फेलिक्ससमक्ष आरोप लावला. तो “नासोरी पंथाचा” पुढारी आहे आणि त्याने मंदिर विटाळविण्याचा प्रयत्न केला असा त्यांनी दावा केला.—प्रेषितांची कृत्ये २४:१-६.
सुरवातीला पौलावर हल्ला करणाऱ्यांना वाटले होते, की केवळ यहूद्यांकरता प्रवेश असलेल्या अंगणात त्रफिम नावाच्या विदेश्याला यायला त्यानेच प्रवृत्त केले होते.a (प्रेषितांची कृत्ये २१:२८, २९) खरे पाहता, त्रफिमने बेकायदा प्रवेश केला असा दावा करण्यात आला होता. पंरतु, पौलाने त्याला प्रवेश करायला मदत किंवा साहाय्य केले होते, असा यहूद्यांनी अर्थ काढला असल्यास हा देखील देहान्त शिक्षेस पात्र असलेला गुन्हा ठरू शकत होता. आणि असे दिसते की, रोमने या गुन्ह्यासाठी देहान्त शिक्षा मान्य केली होती. त्यामुळे, लायसियसऐवजी यहूदी मंदिराच्या शिपायांनी पौलाला अटक केली असती तर सन्हेद्रिनला त्याची चौकशी घेऊन त्याला शिक्षा सुनावण्यात कसलाच अडथळा नसता.
-
-
“मी कैसराजवळ न्याय मागतो!”टेहळणी बुरूज—२००१ | डिसेंबर १५
-
-
a आतले अंगण आणि विदेश्यांचे अंगण यांच्यामध्ये तीन क्युबीट उंच दगडी खांबांची एक रांग आहे. या भिंतीवर ठिकठिकाणी ग्रीक व लॅटिन भाषेत अशा सूचना आहेत: “कोणा विदेश्याला या हद्दीपलीकडे आणि पवित्रस्थानाबाहेरील कुंपणाच्या आत प्रवेश करू देऊ नये. ज्या कोणाला पकडले जाईल त्याला लागलीच मृत्यूदंड दिला जाईल आणि तो स्वतः याला जबाबदार ठरेल.”
-