वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १६
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्ये पुस्तकाची रूपरेषा

    • १६

      • पौल तीमथ्यची निवड करतो (१-५)

      • मासेदोनियातील मनुष्याचा दृष्टान्त (६-१०)

      • फिलिप्पै इथे लुदियाचे परिवर्तन (११-१५)

      • पौल आणि सीला तुरुंगात (१६-२४)

      • तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याचा व त्याच्या घराण्याचा बाप्तिस्मा (२५-३४)

      • अधिकाऱ्‍यांनी क्षमा मागावी अशी पौलची विनंती (३५-४०)

प्रेषितांची कार्यं १६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२२

प्रेषितांची कार्यं १६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००९, पृ. ११

    ५/१५/२००९, पृ. १४

    १/१/१९९१, पृ. २४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२२

प्रेषितांची कार्यं १६:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. ३२

    १२/१/२००३, पृ. २०

    १/१/१९९१, पृ. २४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२२

प्रेषितांची कार्यं १६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२३

प्रेषितांची कार्यं १६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२३

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २४

प्रेषितांची कार्यं १६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ९-१०

    ५/१५/२००८, पृ. ३२

    १/१/१९९१, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२५

प्रेषितांची कार्यं १६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ९-१०

    ५/१५/२००८, पृ. ३२

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२५-१२६

प्रेषितांची कार्यं १६:८

तळटीपा

  • *

    किंवा “मुसियातून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ९-१०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२५-१२६

प्रेषितांची कार्यं १६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ९-१०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२६

प्रेषितांची कार्यं १६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२, १२६

प्रेषितांची कार्यं १६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२४

प्रेषितांची कार्यं १६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २७

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २७

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:१४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २६-२७

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:१५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २७-२८

प्रेषितांची कार्यं १६:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९५, पृ. ७

    १/१/१९९१, पृ. २६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ९५-९६

प्रेषितांची कार्यं १६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९४, पृ. ३०-३१

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९५, पृ. ७

    ४/१/१९९४, पृ. ३०-३१

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०८

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २८

प्रेषितांची कार्यं १६:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२९

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २७

प्रेषितांची कार्यं १६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २७-२८

प्रेषितांची कार्यं १६:२४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२९

    राज्य सेवा,

    २/२०००, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २७-२८

    १/१/१९९१, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २७-२८

    १/१/१९९१, पृ. २६-२७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३०

प्रेषितांची कार्यं १६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २६-२७

    ५/१/१९९०, पृ. ३०

प्रेषितांची कार्यं १६:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००२, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १६:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. १९-२०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३०

प्रेषितांची कार्यं १६:३२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१८, पृ. १०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३०

प्रेषितांची कार्यं १६:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१८, पृ. १०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३०

प्रेषितांची कार्यं १६:३७

तळटीपा

  • *

    किंवा “चौकशी न करताच.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २६-२७

प्रेषितांची कार्यं १६:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३१

प्रेषितांची कार्यं १६:४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३२

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९६, पृ. २८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १६:१-४०

प्रेषितांची कार्यं

१६ नंतर तो दर्बे, तसेच लुस्त्र या शहरातही आला. तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता; पण, त्याचे वडील ग्रीक होते. २ लुस्त्र आणि इकुन्यातील बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे. ३ पौलने आपल्या प्रवासांत तीमथ्यलाही सोबत नेण्याची इच्छा व्यक्‍त केली; मग, त्या ठिकाणी राहणाऱ्‍या यहुद्यांच्या समाधानासाठी त्याने त्याला नेऊन त्याची सुंता केली, कारण तीमथ्यचे वडील ग्रीक आहेत हे सर्वांना माहीत होते. ४ प्रवासादरम्यान, वेगवेगळ्या शहरांत जाऊन ते यरुशलेममधील प्रेषितांनी व वडिलांनी घेतलेले निर्णय बांधवांना सांगायचे, जेणेकरून त्यांना त्यांचे पालन करता येईल. ५ याचा परिणाम असा झाला, की मंडळ्या विश्‍वासात मजबूत होत गेल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्याही वाढू लागली.

६ मग, पवित्र आत्म्याने त्यांना आशिया प्रांतात देवाचे वचन सांगण्यापासून अडवल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतीयाच्या प्रदेशांतून प्रवास करत पुढे गेले. ७ नंतर, मुसिया या ठिकाणी आल्यावर त्यांनी बिथुनिया इथे जाण्याचा प्रयत्न केला. पण, येशूने पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तिथे जाण्यापासून रोखले. ८ त्यामुळे, ते मुसियाच्या मार्गाने* खाली त्रोवसला आले. ९ मग, रात्रीच्या वेळी पौलला एक दृष्टान्त झाला. त्याने पाहिले, की एक मनुष्य त्याच्यासमोर उभा राहून त्याला अशी विनंती करत आहे: “मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर.” १० त्याने हा दृष्टान्त पाहिल्यावर आम्ही लगेच मासेदोनियात जाण्याचा प्रयत्न केला; कारण, तिथल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी देवाने आम्हाला बोलावले आहे, हे आम्ही ओळखले.

११ त्यामुळे, त्रोवस इथून जहाजाने निघून आम्ही सरळ समथ्राके इथे गेलो. आणि दुसऱ्‍या दिवशी नियापुलीस या ठिकाणी पोचलो. १२ तिथून मग आम्ही फिलिप्पै इथे आलो. हे मासेदोनिया जिल्ह्याचे प्रमुख शहर असून तिथे रोमी लोकांची एक वसाहत आहे. या शहरात आम्ही काही दिवस राहिलो. १३ आणि शब्बाथाच्या दिवशी शहराच्या फाटकांबाहेर जाऊन आम्ही एका नदीच्या किनाऱ्‍यावर गेलो. तिथे प्रार्थनेचे एखादे ठिकाण असावे असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही तिथे जाऊन बसलो आणि जमलेल्या स्त्रियांना आनंदाचा संदेश सांगू लागलो. १४ तिथे लुदिया नावाची एक स्त्रीसुद्धा होती. ती थुवतीरा शहराची असून जांभळ्या कपड्यांचा व्यापार करायची. देवाची उपासक असलेली ही स्त्री पौलचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. तेव्हा, पौल सांगत असलेल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी यहोवाने* तिचे अंतःकरण पूर्णपणे उघडले. १५ नंतर, तिने आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतल्यावर ती आम्हाला आग्रह करून म्हणू लागली: “मी यहोवाला* विश्‍वासू आहे असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल, तर माझ्या घरी येऊन राहा.” तिने इतका आग्रह केला, की शेवटी आम्हाला जावेच लागले.

१६ एकदा असे झाले, की प्रार्थनेच्या ठिकाणी जात असताना भविष्य सांगणाऱ्‍या दुरात्म्याने पीडित असलेली एक मुलगी आम्हाला भेटली, जी एक दासी होती. ती भविष्य सांगून आपल्या मालकांना बराच पैसा मिळवून द्यायची. १७ पौल आणि आम्ही जिथे कुठे जायचो तिथे ही मुलगी आमच्या मागेमागे येऊन मोठ्याने ओरडून म्हणायची: “ही माणसं सर्वोच्च देवाचे सेवक आहेत आणि तुम्हाला तारणाचा मार्ग घोषित करत आहेत.” १८ असे ती बऱ्‍याच दिवसांपर्यंत करत राहिली. शेवटी, पौल कंटाळला आणि वळून तिच्यातील दुरात्म्याला म्हणाला: “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम देतो, हिच्यातून बाहेर निघ.” आणि त्याच क्षणी तो दुरात्मा तिच्यातून बाहेर निघाला.

१९ आता आपल्याला कमाईची काहीच आशा उरली नाही, हे पाहून त्या मुलीच्या मालकांनी पौल आणि सीला यांना धरले आणि त्यांना बाजारपेठेत फरफटत नेऊन अधिकाऱ्‍यांपुढे उभे केले. २० त्यांना नगर-अधिकाऱ्‍यांकडे नेऊन ते म्हणाले: “ही माणसं आपल्या शहरात खळबळ माजवत आहेत. हे लोक यहुदी आहेत, २१ आणि ते आपल्याला असे रीतिरिवाज मानायला किंवा पाळायला शिकवतात जे आपल्या रोमी लोकांसाठी योग्य नाहीत.” २२ तेव्हा, लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आणि नगर-अधिकाऱ्‍यांनी त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना सोट्यांनी मार देण्याचा हुकूम दिला. २३ मग, बेदम मारल्यावर त्यांनी त्यांना तुरुंगात टाकले आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याला त्यांच्यावर कडक पहारा ठेवण्याचा हुकूम दिला. २४ असा हुकूम मिळाल्यामुळे त्याने त्यांना आतल्या कोठडीत डांबले आणि त्यांचे पाय खोड्यांत* अडकवले.

२५ पण, मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला प्रार्थना करत होते व गीत गाऊन देवाची स्तुती करत होते आणि बाकीचे कैदी ऐकत होते. २६ तेव्हा, अचानक इतका मोठा भूकंप झाला, की तुरुंगाचा पायासुद्धा हादरला. शिवाय, सर्व दरवाजे एकाएकी सताड उघडले गेले आणि सगळ्यांचे साखळदंड गळून पडले. २७ तुरुंगाचा अधिकारी जागा झाला आणि तुरुंगाचे दरवाजे उघडल्याचे त्याने पाहिले, तेव्हा सर्व कैदी पळून गेले असावेत असे समजून त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी आपली तलवार उपसली. २८ पण, पौल मोठ्याने ओरडून त्याला म्हणाला: “आपला जीव घेऊ नकोस, आम्ही सर्व इथेच आहोत!” २९ तेव्हा, कंदील मागवून तो घाईघाईने आत गेला आणि थरथर कापत पौल आणि सीला यांच्या पायांसमोर पडला. ३० त्यांना बाहेर आणून तो म्हणाला: “आता तुम्हीच सांगा, तारण होण्यासाठी मी काय करू?” ३१ ते त्याला म्हणाले: “प्रभू येशूवर विश्‍वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल.” ३२ असे म्हणून त्यांनी त्याला व त्याच्या घरातल्या सर्वांना यहोवाचे* वचन सांगितले. ३३ मग, तेवढ्या रात्री त्यांना आपल्यासोबत नेऊन त्याने त्यांच्या जखमा धुतल्या. त्यानंतर, विलंब न लावता त्याने आणि त्याच्या घराण्यातील सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. ३४ त्याने त्यांना आपल्या घरी नेऊन जेवू घातले आणि आपल्या संपूर्ण घराण्यासोबत खूप आनंद केला, कारण आता त्याने देवावर विश्‍वास ठेवला होता.

३५ दुसऱ्‍या दिवशी सकाळी, नगर-अधिकाऱ्‍यांनी शिपायांच्या हाती असा निरोप पाठवला, की “त्या माणसांना सोडून द्या.” ३६ तेव्हा, तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याने पौलला तसे सांगितले व म्हटले: “नगर-अधिकाऱ्‍यांनी आपल्या माणसांच्या हाती तुम्हा दोघांना सोडून देण्याचा निरोप पाठवला आहे. तर आता बाहेर या आणि शांतीने जा.” ३७ पण, पौल त्यांना म्हणाला: “आम्ही रोमी नागरिक असूनसुद्धा, गुन्हा सिद्ध न करताच* त्यांनी आम्हाला सर्वांसमोर फटके मारून तुरुंगात डांबले. आणि आता काय आम्हाला गुपचूप इथून बाहेर काढण्याचा त्यांचा विचार आहे? ते काही नाही! त्यांना म्हणावं, स्वतः येऊन आम्हाला इथून बाहेर न्या.” ३८ शिपायांनी जाऊन त्याचे हे शब्द नगर-अधिकाऱ्‍यांच्या कानावर घातले. तेव्हा, ती माणसे रोमी आहेत हे ऐकून ते घाबरले. ३९ त्यामुळे, त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणल्यावर शहर सोडून जाण्याची विनंती केली. ४० पण, तुरुंगातून बाहेर आल्यावर ते लुदियाच्या घरी गेले. मग, बांधवांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिल्यावर ते तिथून निघून गेले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा