वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १७:१४-१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ ते जमलेल्या लोकांजवळ+ आले, तेव्हा एक माणूस येशूजवळ आला आणि गुडघे टेकून त्याला म्हणाला: १५ “प्रभू, माझ्या मुलावर दया करा. कारण तो आजारी आहे आणि त्याला झटके येतात. तो बऱ्‍याचदा आगीत आणि बऱ्‍याचदा पाण्यात पडतो.+ १६ मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणलं होतं. पण ते त्याला बरं करू शकले नाहीत.” १७ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.”

  • लूक ९:३८-४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ इतक्यात, लोकसमुदायातला एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला: “गुरुजी, कृपा करून माझ्या मुलाला बघा. कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.+ ३९ एक दुष्ट स्वर्गदूत त्याला धरतो, तेव्हा तो अचानक ओरडू लागतो. मग तो त्याच्या शरीराला पिळवटून टाकतो आणि मुलाच्या तोंडाला फेस येतो. दुष्ट स्वर्गदूत त्याला जखमी करून फार मुश्‍कीलीने सोडतो. ४० मी त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची तुमच्या शिष्यांना विनंती केली होती, पण त्यांना ते जमलं नाही.” ४१ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? तुझ्या मुलाला माझ्याजवळ आण.”+ ४२ पण मुलगा येशूजवळ येतच होता इतक्यात दुष्ट स्वर्गदूताने त्याला खाली आपटलं आणि वाईट रितीने त्याच्या शरीराला पिळवटून टाकलं. पण येशूने त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावलं आणि मुलाला बरं करून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा