वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ९:१७-२९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ यावर गर्दीतल्या एकाने उत्तर दिलं: “गुरू, माझ्या मुलामध्ये एक मुका दुष्ट स्वर्गदूत* आहे, म्हणून मी त्याला तुमच्याकडे आणलं.+ १८ तो जेव्हा जेव्हा माझ्या मुलाला धरतो तेव्हा तेव्हा त्याला जमिनीवर आपटतो. मग माझ्या मुलाच्या तोंडातून फेस निघू लागतो, तो दात खाऊ लागतो आणि अगदी गळून जातो. त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची मी तुमच्या शिष्यांना विनंती केली, पण त्यांना ते करता आलं नाही.” १९ तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.”+ २० त्यांनी मुलाला त्याच्याजवळ आणलं, पण त्याला पाहताच तो दुष्ट स्वर्गदूत मुलाच्या शरीराला पिळवटू लागला. तेव्हा मुलगा जमिनीवर पडला आणि लोळू लागला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. २१ मग येशूने त्याच्या वडिलांना विचारलं: “याला असं केव्हापासून होतंय?” तो म्हणाला: “लहानपणापासून. २२ आणि बऱ्‍याच वेळा हा दुष्ट स्वर्गदूत त्याला आगीत आणि पाण्यात टाकून त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला काही करता आलं, तर कृपा करून आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” २३ येशू त्याला म्हणाला: “‘काही करता आलं तर,’ असं का म्हणतोस? ज्याला विश्‍वास आहे त्याला सगळं काही शक्य आहे.”+ २४ तेव्हा लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले: “मला विश्‍वास आहे! तो आणखी दृढ करायला मला मदत करा!”+

      २५ येशूने लोकांना त्यांच्याकडे धावत येताना पाहिलं, तेव्हा तो त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावून म्हणाला: “अरे मुक्या आणि बहिऱ्‍या दुष्ट स्वर्गदूता! मी तुला आज्ञा देतो, की त्याच्यातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीच त्याच्यात जाऊ नकोस!”+ २६ मग तो दुष्ट स्वर्गदूत मोठ्याने ओरडून आणि मुलाच्या शरीराला बऱ्‍याच वेळा पिळवटून त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा मुलगा मेलेल्या माणसासारखा जमिनीवर पडून राहिला. त्यामुळे बरेच लोक म्हणू लागले: “मेला तो!” २७ पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठवलं तेव्हा तो उठून उभा राहिला. २८ नंतर तो एका घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारलं: “आम्ही त्याला का काढू शकलो नाही?”+ २९ तो त्यांना म्हणाला: “अशा प्रकारचे दुष्ट स्वर्गदूत फक्‍त प्रार्थनेनेच निघू शकतात.”

  • लूक ९:३८-४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ इतक्यात, लोकसमुदायातला एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला: “गुरुजी, कृपा करून माझ्या मुलाला बघा. कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.+ ३९ एक दुष्ट स्वर्गदूत त्याला धरतो, तेव्हा तो अचानक ओरडू लागतो. मग तो त्याच्या शरीराला पिळवटून टाकतो आणि मुलाच्या तोंडाला फेस येतो. दुष्ट स्वर्गदूत त्याला जखमी करून फार मुश्‍कीलीने सोडतो. ४० मी त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची तुमच्या शिष्यांना विनंती केली होती, पण त्यांना ते जमलं नाही.” ४१ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? तुझ्या मुलाला माझ्याजवळ आण.”+ ४२ पण मुलगा येशूजवळ येतच होता इतक्यात दुष्ट स्वर्गदूताने त्याला खाली आपटलं आणि वाईट रितीने त्याच्या शरीराला पिळवटून टाकलं. पण येशूने त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावलं आणि मुलाला बरं करून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा