-
मत्तय २२:२३-२८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ त्याच दिवशी, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणारे सदूकी लोक+ त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २४ “गुरुजी, मोशेने सांगितलंय की ‘मूलबाळ नसलेल्या एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २५ आमच्या इथे सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं आणि तो मेला. पण त्याला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. २६ दुसऱ्या आणि तिसऱ्या भावासोबत आणि नंतर सातही जणांसोबत असंच झालं. २७ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. २८ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”
-
-
लूक २०:२७-३३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ पण, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणाऱ्या सदूकी* लोकांपैकी+ काही जण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २८ “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलंय, की ‘एखाद्या माणसाच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्याला मूलबाळ नसलं, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २९ एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण मूलबाळ नसतानाच त्याचा मृत्यू झाला. ३० मग दुसऱ्याने ३१ आणि तिसऱ्याने आणि अशा प्रकारे सातही भावांनी तिच्याशी लग्न केलं. पण ते सगळे मूलबाळ न होताच मेले. ३२ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. ३३ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”
-