-
योहान १:३२-३४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३२ योहानने अशीही साक्ष दिली, की “स्वर्गातून पवित्र शक्ती* कबुतराच्या रूपात उतरताना मला दिसली आणि ती त्याच्यावर स्थिर झाली.+ ३३ मलाही त्याची ओळख नव्हती. पण ज्याने मला पाण्यात बाप्तिस्मा द्यायला पाठवलं त्यानेच मला सांगितलं, की ‘ज्या कोणावर तू पवित्र शक्ती उतरताना आणि स्थिर होताना पाहशील,+ तोच पवित्र शक्तीने बाप्तिस्मा देणारा आहे.’+ ३४ आणि मी ते पाहिलंय आणि हाच देवाचा मुलगा आहे अशी साक्ष दिली आहे.”+
-