योहानला झालेलं प्रकटीकरण
२० मग, स्वर्गातून एक स्वर्गदूत उतरताना मला दिसला. त्याच्या हातात अथांग डोहाची किल्ली+ आणि एक मोठा साखळदंड होता. २ त्याने दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या अजगराला,+ म्हणजे त्या जुन्या सापाला+ धरलं आणि त्याला १,००० वर्षांसाठी बांधून ठेवलं. ३ ती १,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना बहकवू नये, म्हणून त्याने त्याला अथांग डोहात+ टाकून दिलं आणि अथांग डोह बंद करून त्यावर शिक्का मारला. यानंतर, थोड्या वेळासाठी त्याला सोडलं जाईल.+
४ तसंच, मला राजासनं दिसली, आणि त्यांवर बसलेल्यांना न्याय करायचा अधिकार देण्यात आला. मग, ज्यांना येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल आणि देवाविषयी सांगत असल्याबद्दल मृत्युदंड देण्यात आला होता;* तसंच, ज्यांनी जंगली पशूची किंवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती,+ त्यांचे जीव* मला दिसले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केलं.+ ५ (पण ती १,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत मेलेल्यांपैकी बाकीचे+ पुन्हा जिवंत झाले नाहीत.) हे पहिलं पुनरुत्थान* आहे.+ ६ जो कोणी पहिल्या पुनरुत्थानाचा भागीदार होतो तो सुखी आणि पवित्र आहे.+ यांच्यावर दुसऱ्या मृत्यूचा+ काहीही अधिकार नाही.+ तर, ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक+ होतील आणि त्याच्यासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य करतील.+
७ ती १,००० वर्षं पूर्ण होताच सैतानाची कैदेतून सुटका केली जाईल. ८ तो पृथ्वीच्या चार दिशांना पसरलेल्या राष्ट्रांना, म्हणजे गोग आणि मागोगला बहकवण्यासाठी आणि त्यांना युद्धाकरता एकत्र करण्यासाठी जाईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. ९ ते संपूर्ण पृथ्वीवर चाल करून गेले आणि त्यांनी पवित्र जनांच्या छावणीला आणि परमप्रिय नगरीला वेढा घातला. पण, स्वर्गातून अग्नीचा वर्षाव झाला आणि त्या अग्नीने त्यांना भस्म केलं.+ १० आणि त्यांना बहकवणाऱ्या सैतानाला* अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात फेकून देण्यात आलं. तिथे जंगली पशू+ आणि खोटा संदेष्टा हे दोघं आधीपासूनच होते.+ आणि त्यांना रात्रंदिवस सदासर्वकाळ यातना दिल्या जातील.*
११ आणि एक मोठं पांढरं राजासन आणि त्यावर जो बसला होता तो मला दिसला.+ पृथ्वी आणि आकाश त्याच्यासमोरून पळून गेले,+ आणि त्यांच्यासाठी कोणतंही ठिकाण सापडलं नाही. १२ मग, मरण पावलेले लहानमोठे राजासनासमोर उभे असलेले मला दिसले आणि गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पण, आणखी एक गुंडाळी उघडण्यात आली; ती जीवनाची गुंडाळी* आहे.+ गुंडाळ्यांमध्ये ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला.+ १३ आणि समुद्राने त्याच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं. तसंच, मृत्यूने आणि कबरेनेसुद्धा* त्यांच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.+ १४ मृत्यू आणि कबर* यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.+ हे अग्नीचं सरोवर+ म्हणजे दुसरा मृत्यू.+ १५ तसंच, ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही,+ त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.+