२ शमुवेल
७ दावीद राजा आपल्या राजमहालात* राहू लागला+ आणि यहोवाने त्याला आसपासच्या सर्व शत्रूंपासून आराम दिला. २ तेव्हा दावीद राजा, नाथान+ संदेष्ट्याला म्हणाला: “इथे मी देवदार लाकडाने बनलेल्या घरात राहतोय.+ पण खऱ्या देवाच्या कराराची पेटी मात्र कापडाच्या तंबूत आहे.”+ ३ त्यावर नाथान राजाला म्हणाला: “तुझ्या मनात आहे तसं कर. कारण यहोवा तुझ्याबरोबर आहे.”+
४ त्याच रात्री नाथानला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ५ “माझा सेवक दावीद याच्याकडे जा आणि त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “तुला माझ्यासाठी राहायला घर बांधायचंय का?+ ६ पण, मी इस्राएली लोकांना इजिप्तमधून* बाहेर आणलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच कुठल्याही घरात राहिलो नाही.+ तंबूत किंवा उपासना मंडपात+ राहूनच मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहिलो. ७ त्या संपूर्ण काळात, मी सर्व इस्राएली लोकांसोबत ठिकठिकाणी गेलो. माझ्या इस्राएली लोकांचा सांभाळ करायला मी इस्राएली वंशांच्या पुढाऱ्यांना नेमलं. पण त्यांच्यापैकी कोणालाही मी कधी एका शब्दाने असं म्हटलं का, की ‘तू माझ्यासाठी देवदाराचं घर का बांधलं नाहीस?’”’ ८ तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तू माळरानात मेंढरांच्या मागे फिरत होतास,+ तेव्हा मी तुला माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी तिथून काढून आणलं.+ ९ तू जिथे कुठे जाशील तिथे मी तुझ्यासोबत असेन.+ मी तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून नाहीसे करीन.+ तसंच, मी तुझं नाव पृथ्वीवरच्या महान पुरुषांसारखं मोठं करीन.+ १० मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना तिथे स्थायिक करीन. ते तिथे राहतील आणि यापुढे कोणीही त्यांना त्रास देणार नाही; दुष्ट लोक पूर्वीप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत.+ ११ माझ्या इस्राएली लोकांवर मी न्यायाधीश नेमले+ त्या काळापासून घडत आलं, तसं यापुढे घडणार नाही; दुष्ट लोक पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत. आणि तुझ्या सर्व शत्रूंपासून मी तुला आराम देईन.+
तसंच यहोवा तुला असंही म्हणाला, की यहोवा तुझ्यासाठी एक राजघराणं तयार करेल.*+ १२ तुझ्या आयुष्याचे दिवस संपून+ तुझा मृत्यू होईल,* तेव्हा मी तुझ्या संततीला,* तुझ्या पोटच्या मुलाला तुझ्यानंतर राजा बनवीन. आणि मी त्याचं राज्य स्थापन करून ते स्थिर करीन.+ १३ माझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तोच एक घर बांधेल+ आणि मी त्याचं राजासन स्थापन करून कायमचं स्थिर करीन.+ १४ मी त्याचा पिता होईन आणि तो माझा मुलगा होईल.+ तो जर चुकला तर मी त्याची चूक सुधारीन* आणि माणसं* फटके देऊन शिक्षा करतात, तशी मी त्याला शिक्षा करीन.+ १५ मी त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचं कधीही सोडणार नाही. ज्या शौलला मी तुझ्यापुढून काढून टाकलं, त्याच्यावर जसं एकनिष्ठ प्रेम करण्याचं मी सोडून दिलं,+ तसं मी त्याच्या बाबतीत करणार नाही. १६ तुझं घराणं आणि तुझं राज्य तुझ्यापुढे कायम सुरक्षित राहील; तुझं राजासन स्थापित होऊन कायम स्थिर राहील.”’”+
१७ नाथानने या सगळ्या गोष्टी आणि हा संपूर्ण दृष्टान्त दावीदला सांगितला.+
१८ तेव्हा दावीद राजा यहोवापुढे येऊन बसला आणि म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! मी कोण आणि माझं घराणं तरी काय? पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी इतकं काही केलंस.+ १९ आणि हेसुद्धा कमी म्हणून की काय, हे सर्वोच्च प्रभू यहोवा! तुझ्या या सेवकाचं घराणं भविष्यात दूरपर्यंत टिकून राहील असंही तू म्हणतोस; आणि हा नियम,* हे सर्वोच्च प्रभू यहोवा, सर्व मानवांसाठी आहे. २० हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तुझ्या सेवकाला, दावीदला तू चांगलं ओळखतोस.+ तर आता मी आणखी काय बोलणार? २१ तू या सर्व महान गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आणि वचन दिल्याप्रमाणे केल्यास आणि तुझ्या या सेवकाला सांगितल्यास.+ २२ म्हणूनच हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू खरोखर महान आहेस.+ तुझ्यासारखा कोणीही नाही+ आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही;+ आम्ही आजपर्यंत आमच्या कानांनी जे काही ऐकलं, त्यावरून आम्ही हे खातरीने म्हणू शकतो. २३ या संपूर्ण पृथ्वीवर तुझ्या इस्राएली लोकांसारखं कोणतं राष्ट्र आहे?+ हे देवा, आपले लोक होण्याकरता तू जाऊन त्यांची सुटका केलीस.+ त्यांच्यासाठी महान आणि अद्भुत कार्यं+ करून तू आपलं नाव मोठं केलंस.+ तू ज्यांची इजिप्तमधून सुटका केलीस, त्या आपल्या लोकांसाठी तू राष्ट्रांना आणि त्यांच्या दैवतांना त्यांच्यापुढून घालवून दिलंस. २४ तू इस्राएली लोकांना कायमसाठी आपलं केलंस+ आणि हे यहोवा, तू त्यांचा देव बनलास.+
२५ आता हे यहोवा देवा, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत आणि त्याच्या घराण्याच्या बाबतीत तू जे वचन दिलंस ते सर्वकाळ पाळ. आणि तू जसं म्हणालास तसंच होऊ दे.+ २६ तुझं नाव सदासर्वकाळ उंचावलं जावो.+ म्हणजे ‘सैन्यांचा देव यहोवा हाच इस्राएलचा देव आहे,’ असं लोक म्हणतील. आणि तुझ्या या सेवकाचं, दावीदचं घराणं कायम तुझ्यापुढे स्थापित असो.+ २७ कारण हे सैन्यांच्या देवा यहोवा, इस्राएलच्या देवा तू आपल्या सेवकाला सांगितलंस, की ‘मी तुझ्यासाठी एक राजघराणं तयार करीन.’*+ आणि म्हणून ही विनंती करण्याची हिंमत तुझ्या या सेवकाला झाली. २८ हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच खरा देव आहेस आणि तुझी वचनं खरी आहेत.+ आणि तुझ्या या सेवकासाठी तू या चांगल्या गोष्टी करण्याचं वचन दिलं आहेस. २९ तेव्हा, तुझ्या या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यात तुला आनंद मिळो आणि ते तुझ्यासमोर कायम टिकून राहो.+ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच हे वचन दिलंस. आणि तुझ्या आशीर्वादाने तुझ्या या सेवकाचं घराणं कायम आशीर्वादित होवो.”+