२ शमुवेल
१५ या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, अबशालोमने आपल्यासाठी एक रथ व काही घोडे घेतले, आणि आपल्यापुढे धावण्यासाठी त्याने ५० माणसं ठेवली.+ २ अबशालोम रोज सकाळी लवकर उठून शहराच्या दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभा राहायचा.+ एखादा माणूस राजाकडे आपलं काही प्रकरण घेऊन न्याय मागायला आला,+ की अबशालोम त्याला बोलावून म्हणायचा: “तू कोणत्या शहरातून आलास?” तेव्हा तो माणूस म्हणायचा: “आपला हा दास इस्राएलच्या अमुक एका वंशातला आहे.” ३ मग अबशालोम त्याला म्हणायचा: “हे बघ, तुझा दावा अगदी योग्य आणि खरा आहे. पण तुझं प्रकरण ऐकून घेणारा राजाच्या वतीने कोणीही नाही.” ४ पुढे अबशालोम म्हणायचा: “या देशात न्यायाधीश म्हणून मला नेमलं असतं, तर किती बरं झालं असतं! मग ज्या कोणाची काही तक्रार किंवा प्रकरण असेल, तो ते माझ्याकडे आणू शकला असता. आणि मी त्याला नक्कीच न्याय दिला असता.”
५ एखादा माणूस अबशालोमला दंडवत घालायला पुढे आला, की अबशालोम हात पुढे करून त्याला धरायचा आणि त्याचा मुका घ्यायचा.+ ६ राजाकडे न्याय मागायला येणाऱ्या सर्व इस्राएली लोकांसोबत तो असंच वागायचा. अशा प्रकारे, अबशालोम इस्राएलच्या सगळ्या लोकांची मनं जिंकू लागला.+
७ पुढे चार वर्षांनी* अबशालोम दावीद राजाला म्हणाला: “कृपा करून मला हेब्रोनला+ जाऊ द्या. म्हणजे मी यहोवाला जो नवस केला होता तो मला फेडता येईल. ८ कारण, आपला हा सेवक सीरियातल्या गशूरमध्ये+ असताना त्याने असा नवस+ केला होता, की ‘यहोवाने जर मला यरुशलेममध्ये परत आणलं, तर मी यहोवासाठी अर्पण वाहीन.’”* ९ त्यावर राजा त्याला म्हणाला: “ठीक आहे, शांतीने जा.” तेव्हा तो निघाला आणि हेब्रोनला गेला.
१० अबशालोमने मग इस्राएलच्या सर्व वंशांमध्ये जासूद पाठवून असं सांगितलं, की “शिंग फुंकल्याचा आवाज ऐकताच अशी घोषणा करा: ‘अबशालोम हेब्रोनमध्ये+ राजा बनलाय!’” ११ अबशालोम हेब्रोनला गेला तेव्हा त्याच्यासोबत यरुशलेममधून २०० माणसं गेली होती. त्याच्या आमंत्रणावरून ती भोळ्या मनाने गेली होती; त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. १२ नंतर, बलिदानं अर्पण करत असताना अबशालोमने दावीदचा सल्लागार+ अहिथोफेल+ याला बोलावून घेतलं; तो गिलो+ इथला राहणारा होता. अबशालोमने रचलेला कट जोर धरत गेला, आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली.+
१३ इकडे, खबर आणणाऱ्या एकाने दावीदला येऊन सांगितलं: “इस्राएलच्या लोकांची मनं अबशालोमकडे वळली आहेत.” १४ हे ऐकून दावीद यरुशलेममध्ये आपल्यासोबत असलेल्या सगळ्या सेवकांना म्हणाला: “चला, आपण इथून पळून जाऊ.+ नाहीतर आपल्यापैकी कोणीही अबशालोमच्या हातून सुटणार नाही! निघा लवकर, नाहीतर तो इथे पोहोचायचा आणि आपला व या शहराचा तलवारीने नाश करायचा.”+ १५ तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले: “आमच्या प्रभूला, राजाला जसं ठीक वाटेल तसं आम्ही करू.”+ १६ म्हणून मग राजा आपल्या सर्व घराण्याला घेऊन निघाला. पण त्याने आपल्या दहा उपपत्नींना+ राजमहाल सांभाळायला तिथेच ठेवलं. १७ राजा निघाला तेव्हा त्याच्या पाठोपाठ सगळे लोकही निघाले, आणि ते बेथ-मरहाक इथे येऊन थांबले.
१८ राजासोबत निघालेले त्याचे सर्व सेवक; तसंच करेथी, पलेथी+ आणि गथमधून+ त्याच्याबरोबर आलेली ६०० गित्ती+ माणसं राजासमोरून जात असताना राजा त्यांची पाहणी करत होता. १९ तेव्हा दावीद, गथच्या राहणाऱ्या इत्तयला+ म्हणाला: “तू का येतोस आमच्याबरोबर? परत जा आणि नवीन राजासोबत राहा. कारण, तू विदेशी असून आपल्या देशातून हद्दपार केलेला आहेस. २० तू काल-परवाच आलेला माणूस आहेस. आणि मी कुठे जाणार हे माझं मलाच माहीत नाही. मग मी तुला आमच्यासोबत इकडे-तिकडे भटकायला कसं लावू? तर आता आपल्या भावांना घेऊन परत जा. यहोवा तुझ्यावर एकनिष्ठ प्रेम करो आणि तुझ्याशी विश्वासूपणे वागो!”+ २१ पण इत्तय राजाला म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ, आणि माझे प्रभू, माझे राजे तुमच्या जिवाची शपथ! माझे प्रभू, माझे राजे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईन; मग त्यासाठी मला मरावं लागलं तरी चालेल!”+ २२ तेव्हा दावीद इत्तयला+ म्हणाला: “ठीक आहे. चल ये आमच्यासोबत.” म्हणून मग गथचा राहणारा इत्तय हा आपल्या सगळ्या माणसांना आणि मुलाबाळांना घेऊन दावीदसोबत गेला.
२३ राजा जेव्हा किद्रोन खोऱ्याजवळ+ उभा होता आणि सगळे लोक खोरं पार करून जात होते, तेव्हा त्या प्रदेशातले सगळे लोक मोठमोठ्याने रडू लागले. दावीदसोबतचे सर्व लोक खोरं पार करून ओसाड रानाकडे जाणाऱ्या रस्त्याने जाऊ लागले. २४ त्या वेळी सादोक+ आणि त्याच्यासोबत खऱ्या देवाच्या कराराची पेटी+ घेऊन जाणारे सगळे लेवीही+ आले.+ आणि त्यांनी खऱ्या देवाच्या कराराची पेटी खाली ठेवली. सगळ्या लोकांनी शहरातून निघून खोरं पार केलं तेव्हा अब्याथारही+ तिथे होता. २५ पण राजा सादोकला म्हणाला: “खऱ्या देवाच्या कराराची पेटी परत शहरात घेऊन जा.+ यहोवाने जर माझ्यावर कृपा केली, तर तो मला परत आणेल आणि ही कराराची पेटी आणि तिचं निवासस्थान+ मला दाखवेल. २६ पण जर तो म्हणाला: ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मग त्याच्या दृष्टीने जे योग्य असेल, ते तो माझ्या बाबतीत करो.” २७ राजा पुढे सादोक याजकाला म्हणाला: “तुम्ही द्रष्टा*+ आहात ना? मग शांतीने परत शहरात जा. आणि तुमची मुलं, म्हणजे अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान+ यांनाही आपल्यासोबत घेऊन जा. २८ आणि पाहा, तुमच्याकडून काही खबर मिळत नाही तोपर्यंत मी ओसाड रानाच्या उतारांजवळच राहीन.”+ २९ म्हणून मग, सादोक आणि अब्याथार यांनी खऱ्या देवाच्या कराराची पेटी परत यरुशलेमला नेली, आणि ते तिथेच राहिले.
३० दावीद मग जैतुनांच्या डोंगरावर+ चढून जाऊ लागला, आणि जात असताना तो रडत होता. त्याचं डोकं झाकलेलं होतं आणि तो अनवाणी चालत होता. त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांनीही आपापलं डोकं झाकलं होतं आणि तेसुद्धा रडतरडत चालले होते. ३१ दावीदला तेव्हा सांगण्यात आलं: “अबशालोमसोबत+ कट करणाऱ्यांमध्ये अहिथोफेलसुद्धा आहे.”+ तेव्हा दावीद म्हणाला: “हे यहोवा!+ कृपया, अहिथोफेलचा सल्ला मूर्खपणाचा समजला जाईल असं कर.”+
३२ मग डोंगरमाथ्यावर जिथे लोक देवाची उपासना करायचे, तिथे दावीद पोहोचला. हूशय+ अर्की+ हा त्याला भेटायला तिथे आला होता; त्याने आपला झगा फाडला होता आणि डोक्यात धूळ टाकली होती. ३३ पण दावीद त्याला म्हणाला: “तू जर माझ्यासोबत आलास, तर मला भार होशील. ३४ त्यापेक्षा शहरात परत जा आणि अबशालोमला असं म्हण: ‘हे राजा, मी तुमचा सेवक! पूर्वी मी तुमच्या वडिलांचा सेवक होतो, पण आता तुमचा सेवक आहे.’+ म्हणजे मग तू अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करून माझी मदत करू शकशील.+ ३५ शिवाय सादोक आणि अब्याथार हे दोघं याजकही तिथे तुझ्यासोबत आहेत. राजाच्या घरात तू जे काही ऐकशील ते सादोक आणि अब्याथार याजकांना सांग.+ ३६ पाहा! तिथे त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलंसुद्धा, म्हणजे सादोकचा मुलगा अहीमास+ आणि अब्याथारचा मुलगा योनाथान+ हेसुद्धा आहेत. तुम्ही जे काही ऐकाल ते त्यांच्या हातून मला कळवा.” ३७ म्हणून मग दावीदचा मित्र* हूशय शहरात गेला;+ त्या वेळी अबशालोम यरुशलेममध्ये प्रवेश करत होता.