-
१ शमुवेल १३:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: “तू अतिशय मूर्खपणे वागलास. तुझ्या देवाने, यहोवाने तुला जी आज्ञा दिली होती ती तू पाळली नाहीस.+ तू ती पाळली असतीस, तर यहोवाने इस्राएलवर तुझं राज्य कायम ठेवलं असतं. १४ पण आता तुझं राज्य टिकणार नाही.+ यहोवा आपल्यासाठी असा एक माणूस शोधेल जो त्याच्या मनासारखा असेल.+ आणि यहोवा त्याला आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी नेमेल.+ कारण तू यहोवाची आज्ञा पाळली नाहीस.”+
-
-
२ शमुवेल ६:२१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ त्यावर दावीद मीखलला म्हणाला: “ज्याने तुझ्या बापाऐवजी आणि त्याच्या संपूर्ण घराण्याऐवजी मला निवडलं, त्या यहोवासमोर मी आनंदोत्सव करत होतो. यहोवाने मला त्याच्या लोकांचा, इस्राएलचा पुढारी म्हणून नेमलं.+ म्हणून यहोवासमोर मी आनंदोत्सव करणारच.
-