-
दानीएल ७:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ रात्रीच्या वेळी मला जे दृष्टान्त दिसले त्यांत मी पुढे पाहिलं, की मनुष्याच्या मुलासारखा कोणीतरी आकाशातल्या ढगांबरोबर येत होता.+ मग जो ‘अति प्राचीन’+ होता त्याच्यासमोर जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी त्याला त्याच्याजवळ नेलं. १४ आणि त्याला राज्याधिकार,+ सन्मान+ आणि राज्य देण्यात आलं; म्हणजे वेगवेगळ्या राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी त्याची सेवा करावी.+ त्याचा राज्याधिकार सदासर्वकाळाचा आहे, आणि त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही.+
-
-
मत्तय ६:९-१३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा:+
‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव+ पवित्र मानलं जावो.+ १० तुझं राज्य+ येवो. तुझी इच्छा+ जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.+ ११ आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.+ १२ आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलंय, तसं तूही आमची कर्जं* माफ कर.+ १३ आम्हाला मोहात पडू देऊ नकोस,*+ तर त्या दुष्टापासून वाचव.’*+
-